मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम वापरकर्त्यांची फसवणूक करणाऱ्या एका ३३ वर्षीय एमबीए पदवीधारकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तोफील अहमद लालमियां सिद्दीक असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव असून, तो कमी शिक्षित किंवा एटीएम वापराची माहिती नसणाऱ्या लोकांना आपला सावज बनवत असे. त्याच्याकडून पोलिसांनी १०० पेक्षा अधिक डेबिट कार्डे जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीक […]
Tag Archives | ATM
डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले
४२ वर्षीय पवईकराच्या खात्यातील १ लाख ५ हजार रुपयांवर कार्ड क्लोनिगच्या माध्यमातून सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे राहणारे राम शर्मा (४२) हे सुतारकाम करतात. त्यांचे इंडीयन बँकेच्या भांडूप […]
एटीएम कार्ड क्लोनिंगद्वारे १६ पवईकरांचे लाखो रुपये उडवले
एकाचवेळी १६ जणांच्या बँक खात्यातून पैसे गायब. पाच जणांची पोलिस ठाण्यात तक्रार. वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएम सेंटरमधून ३.२० लाख रुपये काढले. एकाच वेळी १६ पवईकरांच्या बँक खात्यांना भेदून लाखो रुपये सायबर गुन्हेगारी टोळीने गायब केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या संदर्भात ५ लोकांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाचही जणांच्या खात्यामधून वेगवेगळ्या […]
साकीनाका, तरुणाला मारहाण करून एटीएमबाहेर लुटले
शुक्रवारी साकीनाका येथे दोन अज्ञात इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. तरुण एटीएममधून पैसे काढून निघाल्यानंतर काही मिनिटांत ही घटना साकीनाका येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोमध्ये काम करणारा ऋषिकेश दास साकीनाका येथील एटीएममधून पैसे काढून जात असताना तेथेच उपस्थित असणाऱ्या इसमांनी त्याचा पाठलाग करत त्याला मारहाण करून त्याच्याजवळील रक्कम […]
आयआयटी कामगाराचे एटीएममधून चोरट्याने उडवले २० हजार
एटीएममधील सिसिटीव्ही कॅमेरा बंद असल्याने आणि सुरक्षा रक्षक नसल्याने तपासाची सूत्रे वाऱ्यावर. बँक अधिकाऱ्याचा सहकार्य करण्यास नकार आयआयटी पवई येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममधून पवईकर संतोष सोनावणे यांचे २० हजार रुपये चोरट्यांनी उडवल्याची घटना घडली आहे. सोनावणे यांनी याबाबत एसबीआय आणि पवई पोलीस ठाणे यांना लेखी तक्रार केली असून, तपास सुरु असल्याचे सांगितले […]