Tag Archives | Avartan Powai
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: पवईचा महाराजा
दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]
पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. […]
पवईतील संरक्षक भिंत आणि दरडीचा प्रश्न ऐरणीवरच, पालिकेने उचलले हात
@रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होत असून, वस्त्यांमधील संरक्षक भिंतचा प्रश्न सुद्धा येथील नागरिकांना सतावत असल्यामुळे येथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात २० – २५ वर्ष जुने असणाऱ्या संरक्षक भिंतीची डागडुजी करावी आणि काही भागात नवीन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून युथ […]
बर्थडे पार्टी साजरी करायला गेलेल्या इसमाचा विहार तलावात बुडून मृत्यू
@रविराज शिंदे साई बांगुर्डा येथे पोहायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी विहार तलाव येथे मित्रांसोबत गेलेल्या एका ५२ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली आहे. अग्निशमन दलाच्या साहय्याने त्यांचा शोध सुरु असून, त्यांना अजूनपर्यंत यश लाभले नाही. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने गेल्या तीन दिवसापासून हाहाकार माजवला आहे. […]
आवर्तन पवई दणका: देवीनगरच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास; कचरा उचलला
पवईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या ‘आवर्तन पवई‘चा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. आयआयटी पवई येथील देवीनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून कचऱ्याचा पडलेला ढिगारा आवर्तन पवईच्या बातमी आणि पाठपुराव्यानंतर अखेर कालपासून पालिकेने उचलायला सुरुवात केली आहे. लवकरच संपूर्ण साफसफाई करून औषध फवारणी सुद्धा या भागात पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईचे […]
मार्केट सिग्नलजवळ मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवले; गंभीर जखमी
@अविनाश हजारे पवई गणेशनगर येथे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारसायकलने एका १९ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच, अशाच एका भरधाव मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवल्याची घटना आयआयटी मार्केट येथे घडली आहे. वेगाची ही झिंग फुलेनगर येथे राहणाऱ्या हिना कनोजिया (२०) या तरुणीच्या जीवावर बेतता बेतता राहिली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी सकाळी ८ […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती’ आणि ‘पोलीस दीदी’
@प्रमोद चव्हाण तरुण पिढीला सध्या सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण मुले-मुली त्याच्या आहारी गेल्याचे समोर येत असते. सोबतच लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा दिवसेंदिवस डोके वर काढत आहेत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य, एक वाकडे पाऊल कुठल्या कुठे घेवून जावू शकते याची माहिती करून देण्यासोबत कायदे योग्य […]
पवई तलाव ओसंडून वाहू लागला
@रविराज शिंदे, सुषमा चव्हाण शनिवार, रविवार दोन दिवस मुंबईमध्ये पावसाचा तडाखा सुरू आहे. तलाव भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे पवई तलाव तुडूंब भरून रविवारी वाहू लागला. पावसात भिजण्याचा आनंद आणि पिकनिक करण्यासाठी रविवारी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला […]
बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध
सदर बेवारस पुरुष मन्नुभाई खदान येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला आहे. त्याला राजावाडी रुग्णालयात नेले असता, दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आले असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ०५ जून रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक इसम बेशुद्धावस्थेत पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या डीपी रोड ९ जवळील मन्नुभाई […]
पवई तलावात मृत अवस्थेत पडलेल्या गाईला उचलण्यात पालिकेची टाळाटाळ; चार दिवस पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी
@अविनाश हजारे पाठीमागील आठवड्यात गणेशनगर विसर्जन घाटाजवळ पवई तलावात एक गाय मृत अवस्थेत आढळून आली होती. जवळपास चार दिवस ही गाय तलावातील पाण्यावर तरंगत होती. याची माहिती पालिकेला देवूनही पालिकेने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले होते. बरीच टाळाटाळ केल्यानंतर निसर्गप्रेमींचा वाढता दबाव लक्षात घेता अखेर रविवारी दुपारी ही गाय पालिकेच्या घनकचरा विभागाने कोरा केंद्राच्या साहय्याने […]
पवईतील ‘तो’ लोखंडी बीम रॉड अखेर पडला; सुदैवाने जीवितहानी नाही
@अविनाश हजारे गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असलेला व केव्हाही कोसळेल या अवस्थेत असलेला पवईतील पासपोली कडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी बीम रॉड अखेर पडला असून, त्यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही मात्र या प्रकाराने प्रशासन लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती उदासीन आहे हे या निमित्ताने पहायला मिळत आहे. एस विभाग अंतर्गत येत असलेल्या पवई येथील एल अँड […]
बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध
सदर इसम नामक निपेंद्र महोन्तो (अंदाजे वय ४०) अशोक टॉवर मरोळ येथे आजारी अवस्थेत मिळून आला होता. याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २६ मार्च रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक आजारी इसम मरोळमधील पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या अशोक टॉवर, मारवाह […]
पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत
३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]
आपण यांना पाहिलंत का?
सदर महिला नामे पार्वती ज्ञानू वळवे, ५० या पवई पोलीस ठाणे हद्दीत ३० सप्टेंबर २०१७ रोजी जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर, त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सदर महिलेचा २४ नोव्हेंबर २०१७ रोजी नैसर्गिक (नॅचरल) मृत्य झाला आहे. पोलीस या महिलेच्या नातेवाईकांचा मुंबईसह महाराष्ट्रात शोध घेऊन सुद्धा कोणीच नातेवाईक मिळून आले नाहीत. तरी […]
पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी
@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण पवईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे […]
एमडी ड्रग्जसह पवईत दोघांना अटक
पवईमध्ये ग्राहकाला मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या २ तरुणांना शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. मेहंदीहसन जहीरहसन मिर्झा (२३), नरेश सुरेश माला (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबईत मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रगचा सुळसुळाट वाढला असतानाच, मुंबईत एमडी पुरवणाऱ्या […]
पवई तलावात पडून तरुणाचा मृत्यू
मन्नूभाई चाळ, पवई येथे राहणारा अठरा वर्षीय मोहमद फरहान हा पवई तलावात मासेमारीसाठी गेला असताना पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (रविवारी) संध्याकाळी पवईत घडली. याबाबत पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत. ‘फरहान हा आपल्या काही मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी काल रामबाग येथील पवई तलाव भागात उतरला होता. मासेमारी करताना त्याचा […]
‘फु’काचे सल्ले
प्रसाद वाघ (परीस) डॉक्टर म्हणतायत तुम्ही नावचेच वाघ; शिकारीला लागा ‘ब १२’ नावाचे विट्यामीन कमी पडतय. जनावरं मारुन खायला शिका आता. म्हणल ‘ब’ आणि ‘बारा’ यांच्याशी गुणीले तीन छत्तीसचा आकडा आहे. त्यात शुद्ध शाकाहारी, जनावरे कशी खाऊ? म्हणले मग गोळ्या खा डबाभरुन बी कॉंप्लेक्सच्या. रोज किलोभर चीज खात जा. म्हणलं अय येड्या. वजन अव्वाच्या सव्वा […]