जवळपास १.५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुनर्निर्मितीच्या कामांतर्गत सिमेंटीकरण करून डी पी रोड ९ची रामबागकडून चांदिवलीकडे येणारी वाहिनी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र या वाहिनीवर कब्जा करत मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात असल्याने आणि संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी कचरा फेकला जात असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी वापरात न येता पार्किंग झोन आणि कचरा संकलन केंद्र बनला आहे. […]