महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. या संकटात अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. मग ते रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण बरे करणारे डॉक्टर्स, नर्स असो किंवा रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून अक्षरशः २४ -२४ तास बंदोबस्ताला उभे असणारे पोलिस असो किंवा या संकट काळातही समाजाला योग्य माहिती […]
Tag Archives | Corona Warrior
पवईत कोरोनायोद्धा प्रमाणपत्रांचे पेव
@अविनाश हजारे – सध्या लॉकडाऊनचे कठोर नियमन सुरू असताना स्वकौतुकाचे डोहाळे लागलेल्यांनी स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. विविध संस्थांच्या नावे ‘कोरोनायोद्धा’ सन्मानपत्र मिळवत हे आपले कौतुक करून घेत आहेत. असे सन्मानपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचेही पवई आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पेव फुटले आहेत. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवक, […]
तीन रुग्णालयाने नाकारलेल्या गर्भवतीची त्यांनी घरीच केली प्रसूती
वैद्यकीय यंत्रणा कोरोना विषाणूंशी पूर्णपणे लढत असतानाच अनेकवेळा सामान्य नागरिकांना इतर उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा मिळवताना मोठे खटाटोप करावे लागत आहेत. अशीच वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने नाविलाजास्तव घरात अडकून पडलेल्या गर्भवतीची एका डॉक्टरने घरीच प्रसूती करत तिला आणि बाळाला एक नवीन जीवनदान दिले आहे. डॉक्टर रविंद्र म्हस्के असे त्यांचे नाव असून, चांदिवली संघर्षनगर येथे ते आपली […]
पालिका एस विभागातील कोरोना वॉरियर अधिकाऱ्याचा मृत्यू
रमेश कांबळे | बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागांतर्गत किटकनाशक विभागात काम करणारे कोरोना वॉरियर दिलीप धोंडीराम माने यांचे ३ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. “पालिकेच्या किटकनाशक विभागात काम करणारे माने हे आपल्या कामाप्रती प्रामाणिक होते. सध्या एवढ्या मोठ्या कोरोना संकटाच्या काळात ते […]