सोमवारी राज्य सरकारच्या परवानगीनंतर पवईतील एक दारूचे दुकान उघडले असता दुकानात ८.५ लाखाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. मालकाने दुकान उघडले असता दुकानातील ७.५ लाख किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि १.१० लाखाची रोकड चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले. पवई पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर […]
Tag Archives | duping
आयआयटीच्या प्राध्यापकांची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
प्राध्यापकाच्या मित्राचा मेल हॅक करून त्याच्या आधारे कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी पैशांची मागणी करत आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाची २ लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत समोर आला आहे. या संदर्भात माहिती तंत्रद्यान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश अडकून पडलेला असताना, या सगळ्यांचा ऑनलाईन चोरट्यांनी फायदा उचलला […]
ऑनलाईन डेटिंग फसवणूकीत चार्टर्ड अकाऊटंटला ३.३ लाखाचा गंडा; एकाला अटक
पवई पोलिसांनी पवई येथील ५४ वर्षीय चार्टर्ड अकाऊटंटला साथीदार मिळवून देण्याच्या बहाण्याखा ली ३.३ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला वेस्ट बेंगाल येथून अटक केली आहे. अर्णब सिंग उर्फ नील रॉय बनमाळी (वय २६) हा कोलकाता येथील हावडा येथील रहिवाशी असून, त्याला शनिवारी अटक करण्यात आली. पवई पोलिस त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. दोनदा […]
मुंबईकरांना दीड करोडचा चुना लावणारा महाठग अडकला वाघाच्या पंजात
हिरानंदानी, पवई प्लाझा येथे गोल्डन फार्म नामक कार्यालय थाटून मुंबईकरांना स्वस्तात प्लॉट मिळवून देतो असे सांगून, दीड करोड घेवून पसार झालेल्या महाठग संदीप जाधव याला पवई पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ आणि टिमने ४ वर्षानंतर मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मुंबई, कल्याणसह पुण्यातही याच्यावर गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे. या […]
३ वर्षापासून अटक टाळण्यासाठी परदेशी पळणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई येथील इंटेग्रीटी लॉजिस्टिक सोल्युशन कंपनीत काम करत असताना २.९ कोटी रुपये लांबवून, अटक टाळण्यासाठी परदेशी पळून गेलेल्या एका वाणिज्य पदवीधराला पवई पोलिसांनी गुरुवारी पुणे येथून अटक केली आहे. विजय गोंदर (३५) असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. फसवणूक करून २०१६ पासून तो फरार झाला होता. गुरुवारी पुणे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्याला अटक […]
पवईत सोन्याच्या दुकानात कामगाराची ३५ लाखाची चोरी, राजस्थानमधून अटक
सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने रोकड आणि सोने मिळून जवळपास ३५ लाखाच्या मालावर हात साफ केल्याची घटना पवईतील हिरानंदानीत घडली. या संदर्भात पवई पोलिसांच्या विशेष पथकाने एक वर्षांपासून लपाछपी खेळणाऱ्या रामजास जाट (२९) याला अटक केली आहे. जाट याने रोख रक्कम खर्च केली असून, सोन्याच्या वस्तू त्याच्याकडून हस्तगत झाल्या नाहीत. २९ वर्षीय आरोपी जाट […]