साकिनाका परिसरातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याचा तपास करणाऱ्या साकीनाका पोलिसांनी अथक प्रयत्न करत अवघ्या तीन तासांमध्ये त्याला शोधून काढत आईवडिलांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याच्या उकलीमुळे केवळ अपहरणाच्या गुन्ह्याचाच उलघडा झाला नसून, त्याच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाचे पितळ सुद्धा उघडे पडले आहे. साकिनाका येथील हॉलिडे इन हॉटेल जवळ असणाऱ्या सत्यानगर पाईप लाईन जवळील […]
Tag Archives | featured
चांदिवलीत बनणार भव्य क्रीडा संकुल
चांदिवली म्हाडा वसाहतीतील पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या दोन एकर मैदानात, लवकरच माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ भव्य क्रीडा संकुल बनवण्याचे शिवधनुष्य नुकतेच शिवसेनेत सामिल झालेले परिसराचे नगरसेवक ईश्वर तायडे यांनी उचलले आहे. याचे उदघाटन शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते नुकतेच चांदिवली म्हाडा येथे पार पडले. पवई, चांदिवली भागात मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानांची मोठी […]
आयआयटी, मुंबईची विदयुत कार ‘ओर्का’ फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धेसाठी सज्ज
फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धेसाठी आयआयटी मुंबईची रेसिंग टिम सज्ज झाली असून, विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या ‘ओर्का’ या पाचव्या इलेक्ट्रिक रेसिंग कारचा अनावरण आणि प्रात्यक्षिक सोहळा रविवारी आयआयटीत विद्यार्थ्यांच्या उपस्थित पार पडला. ० ते ३.४७ सेकंदात १०० किमी वेग पकडणाऱ्या या कारच्या साहय्याने आपली छाप नक्की पडेल असा विश्वास आयआयटी मुंबईच्या रेसिंग टिमने दर्शवला आहे. इंग्लंडमधील सिल्वरस्टोन सर्किटवर […]
पवईकर दांपत्याची बीएमडब्ल्यूने विश्वसफर
@pracha2005 पवईकर जेनेट (५५) आणि लुईस (६१) डिसोझा यांना दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी वेगळे चित्तथरारक करण्याची इच्छा होती. त्यातूनच वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले गेले आणि हे जोडपे २० मे पासून आपल्या बीएमडब्ल्यू गाडीने ४० पेक्षा अधिक देशाच्या विश्वसफरीसाठी निघाले आहे. जवळपास ६ ते ७ महिन्याच्या प्रवासात ५० हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची त्यांची ही सफर […]
बस थांब्यांच्या छतासाठी युथ पॉवरचे छत्री आंदोलन
रविराज शिंदे उन्हामुळे शरिराची काहिली होत असतानाचा आयआयटी भागात बसथांब्यांवर लोकांना सावलीसाठी छत नसल्याने, प्रवाश्यांना कडक उन्हाच्या झळा सोसत उभे रहावे लागत आहे. वर्षानुवर्ष सोसत असणाऱ्या पवईकरांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी, येथील युथपॉवरच्यावतीने प्रवाश्यांना छत्री वाटून अनोखा निषेध नोंदवत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारा चिमटा काढला आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड निर्मिती दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी […]
सोमय्यांची पवई तलावाला भेट, पालिका अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
अविनाश हजारे पवई तलावाचे होणारे गटार रोखण्यासाठी आवर्तन पवई, पॉज मुंबई आणि पवईकर यांनी हाती घेतलेल्या पवई तलाव मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खासदार किरीट सोमय्या यांनी तलावाला भेट देत त्याची पाहणी करून झालेल्या दुरावस्थेसाठी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्वरित समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या पवई […]
लेकहोममध्ये घरफोडी, २.५ लाखाचा ऐवज साफ
मंगळवारी चांदिवली येथील लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १२०७/१ मध्ये, डक्टच्या साहय्याने बाथरूममध्ये घुसून, घरातील ६ लाख रुपये किंमतीच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने हात साफ केला आहे. पवई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करत सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे. लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील १२०७/१ मध्ये सहकुटुंब राहणारे विश्वनाथ […]
पवई तलावाला मगर पार्क घोषित करा – पॉज मुंबई
पवई तलावात सोडले जाणाऱ्या दुषित, घाण पाण्यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. जे पाहता प्लॅंट एंड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) मुंबईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री (वन आणि पर्यावरण) प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे पवई तलावाला ‘मगर पार्क’ घोषित करण्याची मागणी केली आहे. सोबतच तलाव भागात परवाना आणि विनापरवाना दोन्ही प्रकारे चालणारी मच्छिमारी रोखण्याची मागणी सुद्धा […]
पवई तलावाचे झाले गटार, निसर्गप्रेमी चिंतेत
करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्यात आसपासच्या परिसरातून गटाराचे पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे तलावातील पाणी दुषित होत असून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून तलावाचे रूपांतर हळूहळू गटारात होत आहे. संपूर्ण पवई तलावाच्या परिसरातून जाताना लोकांना येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. मुंबईकर राजेश पिल्लाई यांनी फोन आणि […]
पवईत लवकरच ‘ओपन जिम’
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी ओपन जिमची आधुनिक संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेनुसार पवईमध्ये सुद्धा अशाच प्रकारची ओपन जिम निर्माण केली जावी म्हणून शिवसेना पुढे आली असून, शिवसेना शाखा ११५ चे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी हिरानंदानी समूहाच्यावतीने पालिकेला नुकत्याच हस्तांतरीत करण्यात आलेल्या पालिका उद्यानात पवईकरांसाठी ओपन जिम तयार करण्याची मागणी केली आहे. लवकरच या […]
डंपरच्या धडकेत दोन ठार, १ जखमी
भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी जोगेश्वरी- विक्रोळी लिंकरोडवर घडली आहे. डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन कार, एक रिक्षा, एक टॅक्सी, एक सिमेंट मिक्सचर सह मोटारसायकलला चिरडत डंपर मातीच्या ढिगाऱ्यात जावून थांबला. याप्रकरणी आरे पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवणे व मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन डम्परचालक रविंदर सिंग […]
पवई उद्यानात भीम अनुयायांनी बसविला बाबासाहेबांचा पूर्णाकृती भव्य पुतळा
पवईतील एल अँड टी समोरील उद्यानाला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचे नाव दिले असताना व या उद्यानात पुतळा बसविण्यास २००८ साली विधिमंडळाने मंजुरी दिली असताना सुद्धा पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०१६ रोजी साजरी करण्यात आलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधत पवईतील भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब […]
त्यांनी परत केले पैशाने भरलेले पाकीट
आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण पवईतील तरुणांच्या कृत्यातून समोर आले आहे. पैशांनी भरलेले पाकीट रस्त्यावर मिळाल्यानंतर पवईकर तरुणांनी प्रामाणिकपणा दाखवत त्या पाकिटाच्या मूळ मालकाचा शोध घेऊन, त्यास पाकीट परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. माता रमाबाईनगर येथील नवदुर्ग मित्र मंडळाचे गणेश सातवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कार्य केले आहे. […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त पवईत विविध कार्यक्रमांचे आयोजन
रविराज शिंदे, अविनाश हजारे, सुषमा चव्हाण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त १४ एप्रिल २०१६ रोजी दिवसभर पवईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण दिवस हा विविध माध्यमातून ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ‘धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन’ तर्फे बाईक […]
दारूच्या नशेत मित्रांनीच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या
पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोरारजीनगर परिसरात एका ३३ वर्षीय युवकाच्या हत्येची घटना समोर आली आहे. मृत इसमाचे नाव सुभाष गोळे असून, दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून मित्रांनीच त्याची हत्या केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत तीन तरुणांना अटक केली आहे. रवी कांबळे (२२), निखिल गायकवाड (२४), मनोर अरेन (२३) अशी […]
पवईत रिपाईला खिंडार, पंडागळे यांचा शिवसेनेत प्रवेश
महानगरपालिका निवडणूक आता काही महिन्यांवर असतानाच, पक्ष व्यवस्थेला कंटाळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि कणा मानले जाणारे सुरेश पंडागळे यांनी आपल्या समर्थकांसह, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, विभाग प्रमुख दत्ता दळवी, शाखाप्रमुख निलेश साळुंखेसह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे एकीकडे शिवसेनेची ताकत पवईत वाढत असतानाच रिपाईला मात्र हे […]
मगरीच्या हल्ल्यानंतर स्थानिकांची सुरक्षा कुंपणाची मागणी
पवई तलावात मासेमारीसाठी जाणाऱ्या लोकांवर होणारे मगरीचे हल्ले वाढलेले आहेत. जे पाहता तिरंदाज व्हिलेज आणि स्थानिक परिसरातील लोक पोलीस आणि पालिका प्रशासन यांना सुरक्षा कुंपणाची मागणी करणारे पत्र देणार आहेत. पवई तलावातील ठराविक भागात सुरक्षा कुंपण टाकून स्थानिक मच्छीमारांसाठी ती जागा मासे पकडण्यासाठी सुरक्षित करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक आणि […]
पवई तलावात मगरीचा हल्ला, मच्छिमार गंभीर जखमी
पवई तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आयआयटी तिरंदाज व्हिलेजमध्ये राहणारे मच्छिमार बाबू भुरे (५०) यांच्यावर पद्मावती मंदिराजवळ मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच परिवारातील विजय भुरे याच्यावर ऑगस्ट २०१० मध्ये हल्ला करून मगरीने जीव घेतला होता. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचे साम्राज्य आहे. तशा सूचना देणारे फलकही पवई […]
पवईत खंडणीच्या गुन्ह्यात महिला पोलीस अधिकारी व दोन शिपायांना अटक
चांदिवली येथील ओसिएन स्पा आणि सलूनमध्ये देह्व्यवसाय चालतो असा खोटा आरोप लावून, धमकी देवून कारवाई टाळण्यासाठी स्पाच्या मालकिणीकडून २ लाख रुपयाची मागणी करून, १० हजार रुपयाची खंडणी उकळणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस निरीक्षकासह २ पोलीस शिपाई, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा (खबरी) व पोलीस असल्याचा दावा करणारी महिला (खबरी) अशा ५ जणांना पवई पोलिसांनी अटक […]