साकीनाका येथील एका २३ वर्षीय महिलेला तिच्या बहिणीच्या बँक खात्यात नॉमिनी नोंद करून देण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने १.८८ लाखाची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचा दावा केल्याने महिलेचा विश्वास बसल्याचा फायदा घेत सायबर चोरांनी तिच्या खात्यातून पैसे काढले. काही दिवसांपूर्वी तक्रारदार महिलेच्या १८ वर्षाच्या बहिणीला अमित मिश्रा नामक एका व्यक्तीचा […]
Tag Archives | fraudster
फार्मा कंपनीला सायबर फ्रॉडद्वारे ४५ लाखाला गंडवले
ईमेल हॅकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन घोटाळेबाजांनी पवई पोलिसांच्या अखत्यारीतील एका फार्मासिटिकल कंपनीला ४५ लाखाला गंडवले आहे. थेट दुसर्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून, कंपनीचे मेल खाते हॅक करून त्यातील सगळे पुराव्यांचे मेल डिलीट करून कोणताही मागमूस न ठेवता मोठ्या सफाईने हे काम करण्यात आले आहे. कंपनीच्या वरिष्ठ संचालकानी यासंदर्भात अज्ञात आरोपींविरोधात ६३.४३५ डॉलर्सच्या (जवळपास ४५ लाख रुपये) […]
९ हजारांच्या परताव्याच्या नावाखाली ठगाने बँक खात्यातून सव्वा लाख उडवले
परदेश वारीच्या वेळी केलेल्या नाश्त्याचे नऊ हजार रुपये ट्रव्हल एजेन्सीकडून परत मिळविण्याच्या नादात एका गृहिणीला सव्वा लाख रुपयाचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या ३९ वर्षीय तक्रारदार गृहिणीने मार्च महिन्यात पर्यटन सुविधा देणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या वेबसाईटवरून सिंगापूर येथे फिरण्यास जाण्यासाठी […]
हनीट्रॅपमध्ये गुंतवून तरुणाला १.३ लाखाला गंडवले
साकीनाका येथील एका तरुणाला फ्रेंड्सशिप क्लबच्या साहय्याने कंटाळवाण्या स्त्रियांना खुश करण्यासाठी १८ हजार रुपये मोबदला देण्याचा बहाणा करत हनीट्रॅपमध्ये अडकवून १.३ लाखाला गंडवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी टोळीविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा नोंद करून, तपास सुरु केला आहे. साकीनाका येथे राहणारा आणि हिरे पॉलिश करणाऱ्या कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या सुरज कुमार […]
३ वर्षापासून अटक टाळण्यासाठी परदेशी पळणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई येथील इंटेग्रीटी लॉजिस्टिक सोल्युशन कंपनीत काम करत असताना २.९ कोटी रुपये लांबवून, अटक टाळण्यासाठी परदेशी पळून गेलेल्या एका वाणिज्य पदवीधराला पवई पोलिसांनी गुरुवारी पुणे येथून अटक केली आहे. विजय गोंदर (३५) असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. फसवणूक करून २०१६ पासून तो फरार झाला होता. गुरुवारी पुणे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्याला अटक […]