Tag Archives | Hiranandani
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: कला विकास मंडळ, तिरंदाज व्हिलेज, पवई
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: पवईचा इच्छापूर्ती
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: पवईचा राजा
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: पवईचा महाराजा
दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]
पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. […]
इलेक्ट्रिक पोलच्या बॉक्सची झाकणे चोरणाऱ्या टोळीची हिरानंदानी एसटीएफतर्फे धरपकड
पवईतील पथदिव्यांच्या इलेक्ट्रिक बॉक्सची झाकणे चोरी करून विकणाऱ्या टोळीतील तिघांना काल दुपारी हिरानंदानी (कमांडो) एसटीएफ पथकाने चोरी करताना रंगेहाथ पकडून, पवई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्याजवळ त्यावेळी १० पेक्षा जास्त अल्युमिनियमची झाकणे आढळून आली आहेत. तिन्ही तरुण हे विशीच्या वयातील असून, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. याबाबत हिरानंदानी एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात परिसरात लावण्यात आलेल्या […]
चांदिवलीत सराफाला दहा लाखांचा गंडा
चांदिवली फार्मरोडवरील एका सराफाला १० लाख ४३ हजार रुपयांना एका ठगाने गंडवल्याची घटना घडली आहे. याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून, साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत. रमेश जैन यांचे चांदिवली फार्मरोड परिसरात दागिन्यांचे दुकान आहे. काही दिवसांपुर्वी दुकानामध्ये एक व्यक्ती दागिने पाहण्यासाठी आला होता. मी खूप दागिने खरेदी करणार असल्याचे सांगत […]
हिरानंदानी कमांडोंनी पकडले दोन लॅपटॉप चोरांना
मुंबईतील विविध भागात गाड्यांमध्ये असलेले लॅपटॉप आणि किंमती वस्तू गाड्यांच्या काचा फोडून लांबवणाऱ्या टोळीतील दोघांना हिरानंदानी येथे चोरी करताना एसटीएफ कमांडोनी पकडून पवई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वासिम सय्यद (४८) आणि अन्वर शेख (४५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून, ते दोघेही मालाड परिसरात राहतात. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच ०२ एसी ४६२७ […]
सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसास तरुणांकडून मारहाण
पवई, हिरानंदानी येथील हेरीटेज उद्यान येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बसलेल्या तरुणांना तिथे दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलीस हवालदाराला काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली.जवाहरलाल राठोड असे या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते पवई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून ४ तरुणांना अटक केली असून, अजून दोन तरुणांचा शोध […]
हिरानंदानीत फुटपाथवर येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी लागणार बुलेट बॅरिअर
हिरानंदानी भागात फुटपाथवर चढून येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी ८ ठिकाणी बुलेट बॅरिअर बसवण्यात येणार आहेत. नगरसेवक फंडातून पालिकेतर्फे हे काम केले जाणार आहे. रविवारी या कामाच्या सुरुवातीचा नारळ नगरसेवक (१२२) वैशाली पाटील, स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, अभिनेता मुकेश रिशी आणि हिरानंदानी नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. पवईतील हिरानंदानी भागात मोठे, सुटसुटीत आणि वाहतूक कोंडी रहित रस्त्यांमुळे महाविद्यालयात […]
पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत
३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]
चांदिवलीत बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मजूरांची सुखरुप सुटका
@प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे चांदिवली येथील हिरानंदानी विकासकाच्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली आहे. अग्निशमन दलाच्या २० – २५ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीतून ७० – ८० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, धूर शरीरात गेल्याने श्वसनास त्रास जाणवू लागलेल्या ६ कामगारांना […]
हिरानंदानी लेबर कॅम्पमध्ये पाण्याची टाकी पडून ७ कामगार जखमी, दोघांची स्थिती गंभीर
आज सकाळी हिरानंदानी कॉम्प्लेक्स, पवई येथील कामगार शिबिरात (लेबर कॅम्प) एक प्रचंड प्लास्टिकची पाण्याची टाकी पडून, सात बांधकाम मजूर जखमी झाल्याची घटना घडली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी खैरलाल अलाम (३५) याला हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी कामगार जितेंद्र निषाद (२१), रुपचंद निषाद […]
विकासकाला २० कोटीची खंडणी मागणाऱ्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
पवईतील एका नामांकित विकासकाला २० करोडची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे (४५) आणि त्याचा गाडी चालक विठ्ठल फालके (४२) याला न्यायालयाने आज (गुरुवार) दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी पवई पोलिसांनी त्यांना मुलूंड येथील हॉटेलमधून खंडणीचा १ करोड रुपयाचा हप्ता स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. विकासक यांच्याकडे २७ वर्ष नोकरी करणारा पाखरे २०१६ […]
विकासकाला २० करोडची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवईमध्ये कार्यालय असणाऱ्या एका नामांकित विकासकाला २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी करून, २ करोड रुपयाची रक्कम स्विकारताना एका खंडणीखोराला आज (बुधवारी) पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुलाब पारखे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो जुन्नर, पुणे येथे जिल्हा परिषद सदस्य असल्याचेही समोर येत आहे. पवई पोलिसांनी भादवि कलम ३८४ नुसार गुन्हा नोंद करून पारखे […]
पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी
@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण पवईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे […]
मोस्ट वॉन्टेड मोलकरणीचा पवईत दुसरा मोठा डल्ला
पवईत घरकामासाठी मोलकरीण म्हणून काम मिळवून काही तासातच घरात असणाऱ्या मौल्यवान वस्तूंवर हात साफ करून पवईत दहशत पसरवणाऱ्या, मोस्ट वॉन्टेड मोलकरणीने गेल्या आठवड्यात हिरानंदानीमध्ये आपला दुसरा डल्ला मारत, एका मोठ्या रकमेवर हात साफ केला आहे. यापूर्वी तिने लेकहोम येथील एका इमारतीत मोठा डल्ला मारला होता. पवई पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद करून विशेष पथक तयार करून […]
पंचश्रीष्टी रस्त्यावर वाहनांना बंदी?
पवईमधील पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्समधून जाणारा रोड हा चांदिवली – हिरानंदानी भागाला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा आहे. मात्र या रोडवर खाजगी वाहनांना प्रवेश निषिद्ध केला जाणार आहे. रहिवाशी संघटनेतर्फे तशा आशयाचे बोर्डस सुद्धा दोन्हीकडील प्रवेशाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. “हा पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्सचा एक खाजगी रस्ता आहे म्हणून येथून बाहेरचे वाहन आणि जड वाहन यांना ये-जा करण्याची परवानगी […]