An 18-year-old first-year student at the Indian Institute of Technology (IIT-B) Bombay committed suicide by jumping from the seventh floor of a hostel building on the campus in Powai on Sunday afternoon. The deceased student, Darshan Rameshbhai Solnki, hails from Ahmedabad in Gujarat. The reason for the suicide is still unclear. He did not leave […]
Tag Archives | IIT-B
आयआयटी – पवईमध्ये १८ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
पवई परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेच्या (IIT-Bombay) कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दर्शन रमेशभाई सोळंखी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थी हा मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा असून, केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेकला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट […]
आयआयटी मुंबई देशात पुन्हा नंबर वन
जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी ‘क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग’ नुकतीच जाहीर झाली आहे. या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत पुन्हा बाजी मारत देशातील विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबई नंबर एकवर कायम राहिले आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत १७२ वा क्रमांक मिळवला आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, संस्थेची प्रतिष्ठा, शिक्षक विद्यार्थी सरासरी, शिक्षकांची कामगिरी, परदेशी शिक्षकांची सरासरी, परदेशी विद्यार्थ्यांची सरासरी असे निकष लक्षात घेत […]
केवायसी फसवणूकीत आयआयटीच्या विद्यार्थिनीने गमावले ८६ हजार
पवईस्थित आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी केवायसी फसवणूकीची नवीनतम बळी ठरली आहे. सायबर चोरट्याने केवायसीच्या नावाखाली तिच्या खात्यातून ८६ हजार रुपये उडवले आहेत. यासंदर्भात पवई पोलीस ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. तक्रारदार तरुणी ही पवईतील आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेत आहे. २४ एप्रिलला ती आपल्या कॅम्पसमध्ये असताना तिच्या मोबाईलवर एका […]
आयआयटी बॉम्बे परिसरात दिसला बिबट्या
संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असताना वन्यजीव, पक्षी हे मात्र मुक्त संचार करत आहेत. असाच संचारासाठी बाहेर पडलेला एक बिबट्या (Leopard) नुकताच आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) परिसरातील लायब्ररी जवळील झाडीत दिसून आला (spotted) आहे. याबाबत आयआयटी बॉम्बेकडून पुष्टी सुद्धा करण्यात आली आहे. हा बिबट्या येथील काही कर्मचाऱ्यांना झाडीत बसलेला दिसल्यानंतर त्यांनी फोन आणि कॅमेऱ्याने त्याचे फोटो […]
७२ तासांत वसतिगृहे खाली करण्याचा आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना आदेश
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयआयटी मुंबईमधील सर्व विद्यार्थ्यांना ७२ तासांत म्हणजेच शुक्रवार, २० मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी संस्थेच्या सर्व विभागप्रमुख आणि प्रशासकीय प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन येणाऱ्या ७२ तासांत आयआयटीमधील येण्या-जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा, वसतिगृहे खाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेचे संचालक सुभाषिश चौधरी […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी पाऊले पडली पुढे
२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ पासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्हीचे औचित्य साधत पवई इंग्लिश हायस्कूल ने गुरुवार, २७ फेब्रुवारीला […]
पवई इंग्लिश हायस्कुल ४०व्या वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सवाची ‘झलक’
पवईतील सर्वात जुनी इंग्रजी माध्यमातील शाळा पवई इंग्लिश हायस्कूलने यावर्षी आपली ४० वर्षे पूर्ण केली आहेत. या आनंदाचा भाग म्हणून शुक्रवारी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात त्यांचा ४०वा वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव “झलक” मोठ्या उत्साहात पार पडला. दोन भागात झालेल्या या शालेय उत्सवात यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध […]
आयआयटी कॅम्पसमधून वायर चोरी करणाऱ्या टोळीसह भंगारवाल्याला अटक
आयआयटी पवई कॅम्पस भागातील सुरक्षा व्यवस्थेला भेदत, येथील तांब्याच्या वायर चोरी करणाऱ्या टोळीच्या तीन लोकांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शुक्रवारी उशिरा अटक केली आहे. या गुन्ह्यातील सगळा चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याला सुद्धा पवई पोलिसांनी अटक करत संपूर्ण चोरीचा माल हस्तगत केला आहे. राहूल नारायण तायडे (२६), संतोष बाबासाहेब गोरे (२६), विनोद राजाराम गुलगे […]
देशातील पहिली मायक्रोप्रोसेसर चिप ‘अजित’ आयआयटी मुंबईने बनवली
पाश्चिमात्य आणि चीन देशाची मक्तेदारी असणाऱ्या मायक्रोप्रोसेसरवर आता भारताने सुद्धा नाव कोरले असून, देशातील पहिली ‘अजित’ ही मायक्रोप्रोसेसर चिप आयआयटी मुंबईने तयार केली आहे. या मायक्रोप्रोसेसरची रचना, आराखडा आणि उत्पादन संपूर्ण काम भारतात करण्यात आले आहे. पुढील वर्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेची उलाढाल सुमारे ४०० अब्जांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत झपाट्याने वाढ […]
अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; पिडीत मुलेच निघाली दुसऱ्या घटनेतील आरोपी
पवई, आयआयटी परिसरात काम करणाऱ्या मजुरांच्या पाच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच पवईत उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे एका गुन्ह्यातील पीडित हे दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून, पहिल्या गुन्ह्यात एका वीस वर्षांच्या तरुणाला तर पहिल्या गुन्ह्यात पिडीत असणाऱ्या दोन मुलांना दुसऱ्या […]
मुंबई आयआयटीतील विद्यार्थीनीना विषबाधा
मुंबई आयआयटीमधील मुलींच्या हॉस्टेल क्रमांक १० मधील विद्यार्थीनीना गोड खाण्यातून विषबाधा झाल्याचे सोमवारी समोर आले आहे. ही विषबाधा शनिवारी झाल्याचे समोर येत असून, सुरुवातीला नाकारणाऱ्या आयआयटी प्रशासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा मान्य केले. विषबाधेमुळे २५ विद्यार्थीनीना आयआयटीच्या अंतर्गत रुग्णालयात दाखल करून, उपचारानंतर सर्वांना सोडून देण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र शेवटची बातमी हाती आली तोपर्यंत काही […]
टम – टम गेल्या, इलेक्ट्रीक बग्गीज आल्या
आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांच्या कॅम्पस भ्रमंतीसाठी १० इलेक्ट्रीक बग्गीज जानेवारी अखेर पासून होणार दाखल. व्यवस्थापनाने १७ मिनी बस सेवा ज्यांना टम-टम म्हणून ओळखले जात होते त्यांना बंद केल्याच्या काही महिन्यांनंतरच ई-बग्गीज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन कॅम्पस पुढाकाराचे पुढील एक पाऊल म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी-बी) कॅम्पस परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी जानेवारीच्या अखेरीस १४-सीटर […]
आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये कोट्यावधीच्या पॅकेजेसचे जॉब ऑफर्स
भरमसाठ पगाराच्या पॅकेजेससाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी प्लेसमेंटचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये १ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत हा टप्पा पार पडला. नेहमीप्रमाणे आयआयटीयन्सला मिळणारे कोट्यवधीचे पॅकेजेस या वेळीही पहायला मिळाले. पहिल्या टप्प्यात प्लेसमेंट प्रक्रियेत निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग हे या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या टप्यात अकराशे […]
आयआयटी मुंबईच्या पीएचडी विद्यार्थ्यांचे कॅम्पस गेटबाहेर आंदोलन
विद्यार्थी कॅम्पस बाहेर आंदोलन करताना रविराज शिंदे आयआय मुंबईतील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने शुक्रवारी (२१ डिसेंबर) प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे आयआयटीत निषेध रँली सुद्धा काढण्यात आली. यावेळी विविध विषयांवर पीएचडी करणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या प्रमुख मागण्यासहित अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी […]
आयआयटीत विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंगेसचे ठिय्या आंदोलन
जगभरातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक छळ होत असल्याचा आरोप होत आहे. फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवरुन विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केलेल्या छळाला वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे यात काही तरुणांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले आहे. आरोप करण्यात आलेला विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. त्याला कॅम्पस फेस्टिवल ‘मूड इंडिगो’ […]
आयआयटी कॅम्पसमध्ये ‘माकड’ चेष्टा
भारतीय प्राध्योगिकी संस्थान (आयआयटी) पवईच्या कॅम्पसमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. वसतिगृहात घुसून, परिसरात कचरा टाकून घाण करणे, सुकण्यासाठी टाकलेली कपडे फेकून देणे, विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरी करणे अशा कुरापती ही माकडे करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. साईन – थिटा सारखी अवघड अभियांत्रिकी गणिते सोडवणाऱ्या येथील इंजिनिअर्सना आता या माकडांना पीटा म्हणावे लागत आहे. […]