गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]
Tag Archives | IIT STudents
स्टार्टअपची क्रांती देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहेत. आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्टअप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. शनिवारी आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये कॉन्वोकेशन हॉलमध्ये पार पडलेल्या आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते […]
आयआयटी, मुंबईची विदयुत कार ‘ओर्का’ फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धेसाठी सज्ज
फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धेसाठी आयआयटी मुंबईची रेसिंग टिम सज्ज झाली असून, विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या ‘ओर्का’ या पाचव्या इलेक्ट्रिक रेसिंग कारचा अनावरण आणि प्रात्यक्षिक सोहळा रविवारी आयआयटीत विद्यार्थ्यांच्या उपस्थित पार पडला. ० ते ३.४७ सेकंदात १०० किमी वेग पकडणाऱ्या या कारच्या साहय्याने आपली छाप नक्की पडेल असा विश्वास आयआयटी मुंबईच्या रेसिंग टिमने दर्शवला आहे. इंग्लंडमधील सिल्वरस्टोन सर्किटवर […]
आयआयटी कॅम्पसमध्ये किरकोळ आग
आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये मंगळवारी संध्याकाळी किरकोळ आग लागल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बनवलेल्या वस्तीगृहाच्या पाठीमागील बाजूस भंगार साठवून ठेवण्याच्या ठिकाणी ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या एका इंजिनच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी संध्याकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास कॅम्पसच्या आतील भंगार, कचरा साठवून ठेवण्याच्या ठिकाणी […]
आयआयटीचे बस स्टॉप हलवले, पण नक्की कोणासाठी? – संतप्त नागरिक
जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरील आयआयटी मेनगेट येथील जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा बेस्ट बस स्टॉप वाहतुकीला अडथळा आणत असल्याने, १ तारखेपासून आयआयटी मेनगेट पादचारी पुलाजवळ हलवण्यात आला आहे. बस स्टॉपला हलवले गेल्याने येथील स्थानिकांना रहदारीतून रस्ता काढत लांब बस स्टॉपवर जावे लागत आहे. यामुळे हा बस स्टॉप नक्की नागरिकांच्या सेवेसाठी हलवला आहे? की व्यावसायिकाला होणाऱ्या अडचणीला […]
शाळेत विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन, विद्यार्थ्याचे १५ दिवसासाठी निलंबन
पवईमधील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे. याबाबत कठोर पाऊले उचलत शाळेने संबंधित विद्यार्थ्याचे १५ दिवसांसाठी शाळेतून निलंबन केले आहे. शाळा आणि घरातील वातावरणात मुलांवर अनेक सुसंस्कार घडत असतात, मात्र सहज उपलब्ध असणारी अनेक माध्यमे व आई-वडील दोघीही नोकरी करत असणाऱ्या परिवारात अनेकदा मुले […]
आयआयटीच्या मुलाचा घात कि अपघात?
दिड महिन्यांपासून गायब असणारा व कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला आयआयटी मुंबईचा (पवई) विद्यार्थी श्रीनिवास चंद्रशेखरचा मृतदेह कर्जत तालुक्यातील सांडशी जंगलात डोंगरकपारीत आढळून आला. २५ ऑक्टोबर रोजी कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला श्रीनिवास अचानक गायब झाला होता. याची माहिती हॉस्टेल सहकार्यांनी त्याच्या पालकांना दिल्यानंतर, आईवडिलांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दिली होती. शेवटी शोधपथकाला शुक्रवारी संध्याकाळी ७ […]
आयआयटीत पाण्याच्या वापराची चंगळ
आयआयटी विद्यार्थ्यांनी पाहणी व अभ्यास करून ‘इनसाइट’ या आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून वास्तव आणले समोर एकीकडे मुंबईकर पाणी टंचाईशी लढत असतानाच, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) मुंबईतील पवई कॅम्पसमध्ये मात्र पाण्याची चंगळ चालू असल्याची खळबळजनक माहिती आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास पाहणीतून समोर आली आहे. मुंबईकरांना सरासरी २६८ लिटर पाणी दररोज वापरास […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये भरली वाहतूक नियमांची शाळा
आयआयटी: प्रतिनिधी भावी पिढीला वाहतुकीचे नियम समजावेत आणि जनजागृती व्हावी म्हणून, मुंबई वाहतूक पोलीस व पवई इंग्लिश हायस्कूल तर्फे शाळेच्या प्रांगणात प्रात्यक्षिक स्वरूपातील ‘वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण’ या विषयावर एका कार्याक्रमाचे आयोजन केले होते. यात शाळेतील लहान मोठ्या अशा सर्व मुलांनी सहभाग घेऊन वाहतुकीचे नियम समजून घेतले. वाहन ही चैनीची वस्तू नसून, ती सध्याची […]
गलेरियाला महानगरपालिकेचा दणका, दुकानाबाहेर वाढवलेल्या जागेला त्वरित हटवण्याची नोटीस
हिरानंदानीतील गलेरिया शॉपिंग मॉलमधील काही दुकानदारांनी आपल्या दुकानात व समोरील मोकळ्या जागेत बदल करून आपली दुकाने वाढवल्यामुळे मॉलची दुर्दशा झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आता ते या मॉलकडे दुर्लक्ष करून आसपासच्या परिसरात असणाऱ्या मॉल्समध्ये खरेदीसाठी जाणे पसंत करत आहेत. या बद्दल राष्ट्रवादीचे युवा संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंग यांनी पालिकेकडे तक्रार केली […]
आयआयटी पवईची विदयुत कार ईवो ४, ‘फॉम्युला स्टुडंट’ स्पर्धेसाठी सज्ज
९ ते १२ जुलै या कालावधीत इंग्लंडमधील सिल्वरस्टोन सर्किटवर ‘फॉम्युला स्टुडंट’ स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेत, जगभरातील १०० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये सहभाग घेणार आहेत. गेली चार वर्ष ह्या स्पर्धेत सहभाग घेणारी आयआयटी मुंबईची रेसिंग टिम, ह्या वर्षी आपल्या वेगवान इलेक्ट्रिक कार ईवो 4 सह मैदानात उतरत आहे. […]