पाश्चिमात्य आणि चीन देशाची मक्तेदारी असणाऱ्या मायक्रोप्रोसेसरवर आता भारताने सुद्धा नाव कोरले असून, देशातील पहिली ‘अजित’ ही मायक्रोप्रोसेसर चिप आयआयटी मुंबईने तयार केली आहे. या मायक्रोप्रोसेसरची रचना, आराखडा आणि उत्पादन संपूर्ण काम भारतात करण्यात आले आहे. पुढील वर्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेची उलाढाल सुमारे ४०० अब्जांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत झपाट्याने वाढ […]