पती – पत्नी दरम्यान सुरु असणाऱ्या भांडणाच्या प्रसंगी पोलिस मदत मागवल्यानंतर निवासस्थानी गेलेल्या पोलिस हवालदाराला मारहाण केल्याबद्दल ४९ वर्षीय माजी सैनिकांला पवई पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र लावंड (४९) असे अटक आरोपीचे नाव असून, तो पवईतील हिरानंदानी येथे राहतो. संरक्षण दलात तो अल्प कालावधीसाठी (शॉर्ट सर्विस) कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास […]
Tag Archives | police constable
बलात्कार, ब्लॅकमेल प्रकरणी पोलिस शिपायाला अटक
विमा कंपनीसाठी काम करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करणे आणि ब्लॅकमेल प्रकरणी पवई पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ४८ वर्षीय पोलीस शिपायाला शनिवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत. मधुकर आव्हाड असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सतत फोन करून ब्लॅकमेल करून हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची तक्रार पिडीत महिलेने पवई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पवई पोलिसांनी अटकेची कारवाई […]
विना हेल्मेट जाताना तरुणांना अडवणाऱ्या पोलिसाला तरुणाच्या वडिलांकडून मारहाण; तिघांना अटक
हेल्मेटशिवाय फिरत असणाऱ्या १९ वर्षीय तरुण बाईकर, त्याच्या मित्राला रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना पवईत घडली. एलएन्डटी येथे पोलिसांनी विनाहेल्मेट आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांच्यावर कारवाईसाठी लावलेल्या नाकाबंदीत हा प्रकार घडला. तिघा आरोपीना सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यात अटक करून पवई पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी तिथे ही धिंगाणा घातला. नशेत गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना […]
सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसास तरुणांकडून मारहाण
पवई, हिरानंदानी येथील हेरीटेज उद्यान येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बसलेल्या तरुणांना तिथे दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलीस हवालदाराला काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली.जवाहरलाल राठोड असे या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते पवई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून ४ तरुणांना अटक केली असून, अजून दोन तरुणांचा शोध […]
पोलिस शिपायाने कर्तव्यावर असताना रक्तदान करुन जपली सामाजिक बांधिलकी
प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे, हे समजताच पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई गणेश कट्टे यांनी रुग्णालयात जावून रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपत एक उदाहरण जगासमोर निर्माण केले आहे. आयआयटी पवई येथील झुरी कंपाऊंड भागात राहणारे निलेश नागे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या […]
पोलीस शिपायाने सिमेंट मिक्सरमध्ये अडकलेल्या तरुणाला दिले जीवनदान
साकीनाका पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपाई वैजनाथ कांबळे यांनी सिमेंट मिक्सरमध्ये अडकून पडलेल्या लालबहादूर (३५) या तरुणाला धाडसाने वाचवून जीवनदान देत मुंबई पोलिसांच्या शौर्याची प्रचिती दिली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याशी जोडल्या गेलेल्या शिपायांच्या धाडसाची ही दुसरी कहाणी आहे. या पूर्वीही अजून एक पोलीस शिपायाने आत्महत्येसाठी डोंगरावर चढलेल्या तरुणाचा जीव वाचवण्याचे धाडसी कृत्य केले होते. बुधवारी नेहमी […]