Tag Archives | Powai Lake
आवर्तन पवई “संडे स्पेशल” १७ नोव्हेंबर २०१९
आवर्तन पवई “संडे स्पेशल” १० नोव्हेंबर २०१९
मेट्रो – ६ घेणार ३४० झाडांचा जीव?
पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर मेट्रो – ६ प्रकल्पात कुऱ्हाड स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मार्गावर चालणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे. पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर या प्रकल्पासाठी […]
आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांची पालिकेसोबत पवई तलाव स्वच्छता मोहीम
मुंबईतील पवई तलावाची पाण्याची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे ऱ्हास झाली आहे. सांडपाण्या व्यतिरिक्त, घनकचरा विशेषत: प्लॅस्टिक, सांडपाणी पावसाच्या तलावामध्ये सोडले जाते. पवई तलाव भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या भागात टाकलेल्या कचऱ्यामुळे, तलाव पात्रात टाकलेल्या निर्माल्यामुळे या भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत जात असतानाच पवई तलावाला वाचवण्यासाठी अभुदय – आयआयटी पवई आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पवई तलाव […]
आवर्तन पवई “संडे स्पेशल” ०३ नोव्हेंबर २०१९
आवर्तन पवई “संडे स्पेशल” २७ ऑक्टोबर २०१९
लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी
चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]
पवई तलावातील जलपर्णी काढण्यापासून पालिकेची चालढकल
पवई तलावाला हळूहळू नष्ट करणाऱ्या जलपर्णीना काढण्याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिका्यांनी नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. एका अधिकाऱ्याने प्रतिनिधीना सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे […]
मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून पवई तलावात ढकलले
पवई तलावात इसमांना बेकायदेशीर मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून त्याला पवई तलावामध्ये ढकलून दिल्याची घटना घडली आहे. शेरबहादूर खान असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. सुरक्षा रक्षकाने यासंदर्भात पवई पोलिस ठाणे गाठत दोघांविरूद्ध तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असून, गुन्ह्यात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली […]
सात दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणेश विसर्जन घाटाजवळ होमगार्ड अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
पवई येथे शनिवारी रात्री घडलेल्या हिट अँड रन अपघातात एका २५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण हा होमगार्ड अधिकारी होता. शनिवारी रात्री कर्तव्यावरुन परतत असताना हा अपघात घडला. पवई पोलिसांनी याबाबत अज्ञात वाहनचालकाविरुध्द निष्काळजीपणे आणि हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन काशिनाथ धुमक यांना शनिवारी मरोळ […]
युवा पर्यावरण प्रेमींनी बनवला इको गणेशा, यंग एन्वायरमेंटलिस्ट्स ट्रस्टचा उपक्रम
गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पाचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी […]
“माय इंडिया” पवई तलावावर सेल्फी पॉईंट; आमदार निधीतून निर्माण
पवई तलावाचे पर्यटन महत्व लक्षात घेऊन आमदार निधीतून नुकतेच “माय इंडिया” सेल्फी पॉईंटची निर्मिती येथे करण्यात आली आहे. स्थानिक आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांच्या निधीतून याची निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटचे रविवारी पवईतील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या आमदारासोबत सेल्फी घेत उद्घाटन केले. यावेळी सुट्टीचा दिवस असतानाही आणि भर पावसात मोठ्या प्रमाणात पवईतील […]
पवई तलावावर जलपर्णींचे साम्राज्य; सहा महिन्यांपासून स्वच्छता नाही
कंत्राटदाराची नेमणूक करणे बाकी असल्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असणाऱ्या पवई तलावाला सहा महिन्यांपासून साफ केले गेले नाही. जर लवकरात लवकर जलपर्णीना काढून टाकले नाही तर लवकरच तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापला जाईल अशी चिंता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईचे वैभव असणारा पवई तलाव दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची पाणी साठवण्याची क्षमता हळू हळू […]
पवई तलावात पोहायला गेलेल्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
पवई तलावात आपल्या मित्रांसोबत पोहायला आलेल्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (सोमवारी) संध्याकाळी ६.२० वाजता पवई तलाव भागात घडली. सत्यम गुप्ता असे या मुलाचे नाव असून, तो विक्रोळी टागोरनगर येथील रहिवाशी होता. याबाबत पवई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विक्रोळी येथील टागोरनगर भागात राहणारे काही तरुण काल संध्याकाळी पवई […]
पवई पोलिसांनी पकडला ३७ किलो गांजा; दोघांना अटक
पवई परिसरात मोठ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणलेल्या ५.५ लाखाच्या गांजासह पवई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. अनिकेत अमर पवार (२४), सुरेश झोकु गुप्ता (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कलम ८ (क) सह २० एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पवई पोलिसांनी […]
पवई तलावाचा जलक्रीडा प्रस्ताव गुंडाळला
या तलावात निर्माण झालेल्या प्रदूषणापासून तलावाला वाचवण्यासाठी, पुनर्विकास करण्यासाठी आणि त्यास संरक्षित करण्यासाठी अनेक योजनांवर काम केले जात आहे. तलावात समृद्ध जैव विविधता आणि मगरीच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. पवई तलाव भागाचे सुशोभिकरण केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. पवई तलावात स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सारख्या जलक्रीडा सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसा ठरावही […]
पवईत रेस्टोबारवर छापा, मालकासह ६ कर्मचाऱ्यांना अटक
पवईतील एका रेस्टोबारवर मुंबई पोलिसांनी छापा मारत रेस्टोबारच्या मालकासह सहा कर्मचाऱ्याना रविवारी अटक करण्यात आली. आस्थापनेला पब चालविण्याची परवानगी नव्हती आणि निर्धारित मुदतीच्या पलीकडे पब चालू ठेवण्यात आला होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील जोगेश्वरी विक्रोळी […]