उशिराने एन्ट्री घेतलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांची चांगलीच धुलाई केली आहे. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मुंबईवर अस्मानी संकट कोसळले असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मुसळधार पावसामुळे साकीनाका, चांदीवली, आयआयटी पवई परिसरातील अनेक घरात पाणी भरल्याने स्थानिकांच्या घरातील किंमती वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जून महिन्यातील […]
Tag Archives | Powai Lake
पवई तलाव भागात तरुणावर प्राणघातक हल्ला; एकाला अटक, दोघांचा शोध सुरु
पवई तलाव भागात तरुणीला छेडछाड करणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्री ७.३० वाजता पवई परिसरात घडली आहे. रोहित बावधाने असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी भादवि कलम ३२६ नुसार गुन्हा नोंद करून, हल्ला करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात […]
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागातील डेब्रिज उचलली
आवर्तन पवई आणि पवईकरांच्या परिश्रमाला यश मिळाले असून, पवई तलाव भागात टाकला जाणारी डेब्रिज उचलण्यास सुरुवात झाली आहे. आवर्तन पवई सह पवईकर मुक्ताराम कांबळे, डीपीके उदास यांनी पालिकेला लेखी तक्रार करत याकडे लक्ष वेधले होते. अनेक पवईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना यश आले असून, फुटपाथ आणि चालण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील […]
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागात डेब्रिज टाकणाऱ्या विरोधात पालिका दाखल करणार फौजदारी गुन्हा
पाठीमागील काही दिवसांपासून पवई तलाव भागात अज्ञान व्यक्तींकडून बांधकाम आणि खोदकामाची डेब्रिज (मलबा) टाकला जात असून, यामुळे पवई तलावाचे भवितव्य धोक्यात येत आहे. या परिस्थितीला घेवून “आवर्तन पवई”ने ३० मे रोजी पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा या मथळ्याखाली बातमी करत पाठपुरावा करून पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालिकेने […]
पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा
ग्रामीण भागात घरातून निघणारा कचरा, घाण, जनावरांच्या गोठ्यातून निघणारे मैल–मुत्र टाकण्यासाठी परिसरात मोकळ्या जागेत भलामोठ्या रुंदीचा खड्डा मारून त्यात ते टाकले जाते. ज्यास ग्रामीण भाषेत “उकीरंडा” असा शब्द वापरला जातो. पवईतील पवई तलाव भागाची सुद्धा पाठीमागील काही वर्षात अशीच अवस्था झाली आहे. परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी सध्या तलावात सोडले जात असून, त्याचा श्वास गुदमरू लागला […]
मेट्रो – ६ प्रकल्पामुळे पवई तलावाचे ‘मगर उद्यान’ गुंडाळले
मुंबईतील पहिलेवहिले मगर उद्यान पवई तलावात बनवण्याचे महापालिकेचे स्वप्न जवळपास भंगल्यात जमा आहे. मेट्रो सहा प्रकल्पा अंतर्गत लोखंडवाला-जोगेश्वरी-पवई-विक्रोळी-कांजुरमार्ग असा मेट्रो सहाचा कॉरीडोर निश्चित केला आहे. या मेट्रो-सहा प्रकल्पाच्या कामात पवईमधील पवई तलाव परिसरातील काही भाग बाधित होणार असल्याकारणाने प्रस्तावित मगर उद्यानाचा विचार मेट्रो पूर्ण झाल्यानंतर केला जाणार आहे. २०० हेक्टर जागेत निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या […]
पवई तलावाची स्वच्छता जागतिकस्तरावर; भारतातील पहिलाच प्रयोग
परदेशातील नद्या, तलावे इतके स्वच्छ असतात की त्यांच्या सौंदर्याची कुणालाही भुरळ पडते. भारतातील नद्या आणि तलाव गटारगंगा झाल्या आहेत. जे पाहता मुंबई महानगर पालिकेने प्रदूषित मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच दासून इंटरनॅशनल या कॅनेडियन कंपनीसोबत एक करार करण्यात येणार आहे. पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिका कॅनडातील […]
मेट्रो – ६ भूमिगत मार्गाने करण्याची पवईकरांची मागणी
स्वामी समर्थनगर – जोगेश्वरी – कांजुरमार्ग – विक्रोळी या मार्गावर होणारा मेट्रो – ६ प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी पवईकरांकडून केली जात आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड़वर होणाऱ्या वाहतूक कोंडीसह हा एलिवेटेड मार्ग पवई तलाव आणि परिसराचे सौदर्य बिघडवणार असल्याने, पवईकरांनी याला विरोध दर्शवत भूमिगत मार्गाने करण्याची मागणी केली आहे. पवईकरांमध्ये याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वृत्तपत्रांमधून पत्रके […]
एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असताना चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मरोळ भवानीनगर येथे एटीएम फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका चोरट्याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केली तेव्हा एटीएम फोडण्याचा त्याचा दुसरा प्रयत्न सुरु होता. गणेश दापसे (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, जागरूक स्थानिकांने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला गुन्हा घडत असताना अटक करण्यात आली. दापसे याला तात्काळ पैसे कमवायचे असल्याने त्याने […]
पवई तलाव घाटावर छठ पूजा हर्षोल्हासात
उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा सण, सूर्य आणि त्याची पत्नी उषा यांना समर्पित असलेली ‘छठ पूजा’ पवईत हर्षोल्हासात साजरी झाली. पवई तलाव घाटावर हजारोच्या संख्येने भाविकांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत छट पूजा साजरी केली. उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी विविध संस्थांकडून सोयी-सुविधा देण्यात पुढाकार दिसला. यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या, आमदार नसीम खान यांच्यासह भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास […]
विहार तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
आपल्या महाविद्यालयीन मित्रांसोबत विहार तलाव भागात फिरण्यासाठी गेलेल्या पवईतील एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. दिपक शिवाजी कुटे (१८) असे या तरुणाचे नाव असून, तो आयआयटी कॅम्पसमध्ये आपल्या परिवारासोबत राहत होता. याबाबत मुलुंड पोलिस अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत. गेल्या काही वर्षात पवई आणि आसपासच्या भागात असणारे तलाव […]
पवई तलाव गणेश विसर्जन २०१८
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा !
पवईत पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी रस्त्यावर
@रविराज शिंदे पवईमधील आयआयटी कॅम्पसमधून जाणारी पालिकेची मोठी जलवाहिनी आज (मंगळवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फुटली. पालिका अधिकारी तिथे पोहचून काम सुरु होईपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते. आधीच मुंबईत पाण्याची कपात सुरु असताना अशी घटना मुंबईकरांच्या संतापाचे कारण ठरले. याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजताच्या दरम्यान आयआयटीच्या कॅम्पस भागातून जाणारी पालिकेची भलीमोठी […]
पवई तलावात विसर्जना वेळी मुर्ती पडून दोन तरुण जखमी
काल अकराव्या दिवशी पवई तलावावर विसर्जन सुरु असताना क्रेनवरील मूर्तीचा तोल बिघडून पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाल्याची घटना पवईत घडली. सागर चांडालीया (३२) आणि रफिक शेख (२९) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांवर राजावाडी येथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पवई तलावावरील […]