Tag Archives | powai news

gopal sharma circle1

बेजबाबदारपणे उभ्या शालेय बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे हिरानंदानी जाम

एस एम शेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूल यांच्या वाहनांमुळे हिरानंदानी आणि जलवायू विहार भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यात काहीच फरक पडला नसून, शाळेच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. याबाबत आता वाहतूक विभाग सुद्धा हतबल झालेला दिसत असून, नक्की करायचे काय? हा […]

Continue Reading 0
Asssistant commissioner L Ward

चांदिवलीतील समस्यांसाठी पालिका सहाय्यक आयुक्तांना चांदिवलीकरांचे तक्रारपत्र

चांदिवली परिसरात पालिकेशी निगडीत असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सोमवारी पालिका ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळुंज यांना समस्यांचे पत्र देण्यात आले. त्यांनी यावेळी लवकरच त्यांच्या या समस्यांचा अभ्यास करत कारवाईचे आश्वासन दिले. जवळपास ३.५ लाखाची लोकसंख्या असणाऱ्या चांदिवली परिसरात पाठीमागील काही वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, शहर नियोजनात मात्र […]

Continue Reading 0
DSC09622

पवई तलावाची स्वच्छता जागतिकस्तरावर; भारतातील पहिलाच प्रयोग

परदेशातील नद्या, तलावे इतके स्वच्छ असतात की त्यांच्या सौंदर्याची कुणालाही भुरळ पडते. भारतातील नद्या आणि तलाव गटारगंगा झाल्या आहेत. जे पाहता मुंबई महानगर पालिकेने प्रदूषित मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच दासून इंटरनॅशनल या कॅनेडियन कंपनीसोबत एक करार करण्यात येणार आहे. पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिका कॅनडातील […]

Continue Reading 0
Chandivali residents march against encroachments

वाहतूक कोंडी, अतिक्रमण विरोधात चांदिवलीकर रस्त्यावर

चांदीवली परिसरात वाढत्या वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण विरोधात एकत्रित येत चांदिवलीकरांनी रविवारी, २१ एप्रिलला रस्त्यावर उतरून शांतता मोर्चा काढत आपला राग व्यक्त केला. चांदिवली रहिवाशी संघटनेतर्फे (चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिशन) काढलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने चांदिवलीकर सहभागी झाले होते. आमच्या या समस्यांचे लवकरात लवकर निवारण नाही झाले तर २९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक

पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार रोड भागात घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच अटक केली आहे. दिपक उर्फ लीचू जगबीर सारसर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ३ गुन्ह्यांची उकल त्याच्या अटकेतून झाली आहे. पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार […]

Continue Reading 0
suicide death

विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्राध्यापक विरोधात गुन्हा दाखल

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मध्ये शिक्षण घेणाऱ्या रामबाग येथील संकेत तांबे प्राध्यापकांच्या अपमानास्पद बोलण्यानंतर निराशेत असताना सोमवारी आत्महत्या केल्यानंतर पवई पोलिसांनी प्राध्यापकाला समन्स पाठवले आहेत. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवईतील रामबाग येथे राहणारा संकेत तांबे टीसमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याने तिथे जाणे बंद केले होते. याबाबत पालकांनी विचारणा केली […]

Continue Reading 0
suicide

मानसिक तणावातून पवईत दोन तरुणांची आत्महत्या

मानसिक त्रासाला कंटाळून पवईतील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना पाठीमागील दोन दिवसात घडल्या आहेत. पवईतील कॉस्मोपॉलिटिन इमारतीत राहणारा संकेत तांबे याने सोमवारी राहत्या इमारतीच्या ८ मजल्यावरील रीफ्युजी एरियातून उडी मारून आत्महत्या केली. तर फिल्टरपाडा येथे राहणारा तरुण ओम बाली (१८) याने कांजुरमार्ग येथे लोकलखाली आत्महत्या केली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा हुशार विद्यार्थी होता. […]

Continue Reading 0
bike accident

पवईत टेम्पोखाली आल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू

एका मोटारसायकल चालकाचा टेम्पोखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पवईत घडली. साकीविहार रोडवर हा अपघात घडला. मोहम्मद खान (२०) असे अपघातात मृत्यू पावलेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी टेंम्पो चालक रामसुंदर यादव (२९) याला अटक केली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान आपला अजून एक मित्र मोहम्मद कुरेशी (२०) याच्यासोबत मोटारसायकलवरून […]

Continue Reading 0
suspect

रमाबाईनगरमधून चोरट्याने मोबाईल पळवले; संशयित सिसिटीव्हीत कैद

पवई, आयआयटी येथील रमाबाईनगर येथील घरात घुसून दोन मोबाईल लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे पवईत घडली आहे. मोबाईल चोरी करून पसार होणारा हा संशयित चोरटा येथील सिसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरु आहे. अशा प्रकारे घरात घुसून चोरी करणारी टोळीच परिसरात कार्यरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गणेश गायकवाड हे आयआयटी येथील रमाबाईनगर येथे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!