Tag Archives | Powai Police

cartoon

विना हेल्मेट जाताना तरुणांना अडवणाऱ्या पोलिसाला तरुणाच्या वडिलांकडून मारहाण; तिघांना अटक

हेल्मेटशिवाय फिरत असणाऱ्या १९ वर्षीय तरुण बाईकर, त्याच्या मित्राला रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना पवईत घडली. एलएन्डटी येथे पोलिसांनी विनाहेल्मेट आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांच्यावर कारवाईसाठी लावलेल्या नाकाबंदीत हा प्रकार घडला. तिघा आरोपीना सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यात अटक करून पवई पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी तिथे ही धिंगाणा घातला. नशेत गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना […]

Continue Reading 0
burning car

पवईत जेव्हीएलआरवर धावती कार पेटली, तीन दिवसात दोन घटना

पवईतील गणेशनगर (पंचकुटिर) येथे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या महिंद्रा झायलो कारला आग लागून, जळून खाक झाल्याची घटना काल (मंगळवार, २१ नोव्हेंबर) रात्री घडली. तर दुसऱ्या घटनेत रविवारी रात्री गांधीनगरच्याच दिशेने जाणारी स्विफ्ट कार आयआयटी मार्केटजवळ जळाल्याची घटना घडली. दोन्ही घटनेत आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात […]

Continue Reading 0
Minors runs to meet Jethalal

वडिलांवर असणारे कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन भावंडे घरातून पळाली

आपल्या वडिलांच्यावर असणारे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मेहनत केली पाहिजे, हा चंग बांधून साकीनाका येथील आपल्या घरातून पळून गेलेल्या ४ मुलांना सामाजिक कार्यकर्त्यांनी ताब्यात घेऊन साकीनाका पोलिसांच्या मदतीने सुखरूप घरी परतवले आहे. बिहारला जाणारी ट्रेन पकडण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. पळून गेलेली मुले ८ ते ११ वर्ष वयोगटातील भावंडे आहेत. गोलू अनिल शाहू (वय […]

Continue Reading 0
laptop chor

भांडण सोडवायला गेलेल्या व्यावसायिकाचे चोरट्याने १५ लाख पळवले

दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकात होणारे भांडण सोडवायला गेलेल्या साकीनाका येथील एका व्यावसायिकाचे १५ लाख रुपये पळवल्याची घटना पवईतील मारवाह रोडवर घडली आहे. सोमवारी रात्री व्यापारी ऑटो रिक्षामधून प्रवास करीत असताना ही घटना घडली. पवई पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवित तपास सुरु केला आहे. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्वरित वैयक्तिक आर्थिक गरज असल्यामुळे रात्री १०.३० वाजता पैसे […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असताना चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मरोळ भवानीनगर येथे एटीएम फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका चोरट्याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केली तेव्हा एटीएम फोडण्याचा त्याचा दुसरा प्रयत्न सुरु होता. गणेश दापसे (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, जागरूक स्थानिकांने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला गुन्हा घडत असताना अटक करण्यात आली. दापसे याला तात्काळ पैसे कमवायचे असल्याने त्याने […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

भररस्त्यात चाकूहल्ला करून चोरी करणाऱ्या टोळीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवईत दोन जणांवर भररस्त्यात चाकूहल्ला करून, चोरी करून पळून गेलेल्या तिघांच्या टोळीला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अश्रफ ऊर्फ सोनू अमीन शेख, स्वॅलेन ऊर्फ सोहेल शाहनवाज चौधरी आणि फैजान मन्नान सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही न्यायालयाने १६ तारखेपर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडी सुनावली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुले […]

Continue Reading 0
panchkutir skywalk

पंचकुटिर पादचारी पुलावर विधी शाखेच्या विद्यार्थ्यासोबत लूटमार

पवई, आयआयटी कॅम्पसमध्ये राहणार २१ वर्षीय विधी शाखेचा विद्यार्थी अनिरुद्ध सावंत याला तीन अज्ञात इसमांनी पंचकुटिर पादचारी पुलावर गाठून, त्याच्या जवळील पैसे व मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री पवई परिसरात घडली. रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. विद्यार्थ्याने याबाबत पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पैसे, फोन देण्यास […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

चोरी करून पळून गेलेल्या कामगाराला लोणावळ्याच्या हॉटेलमधून अटक

पवईतील एका हॉटेलमधून ५० हजाराची रोकड आणि दुधव्यावसायिकाची मोटारसायकल पळवून नेणाऱ्या चोराला पवई पोलिसांनी अटक केली आहे. कमरूल इस्लाम जुबेद अहमद तफादार (३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा नेपाळचा आहे. लोणावळा येथील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीला गेलेली ऍक्टिवा मोटारसायकल (एम एच ०३ सी डब्ल्यू ८३१६) पोलिसांनी हस्तगत […]

Continue Reading 0
fraud

हवाई सुंदरीच्या नोकरीच्या अमिषाने तरुणींची फसवणूक

हवाई सुंदरीची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन तरुणींना गंडा घालणाऱ्या नासिर हुसेन मोहमद्दीन खान या ठगाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वीही साकीनाका आणि नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खानने अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पवईमध्ये राहणारी निता (बदललेले नाव) हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेऊन चांगल्या नोकरीच्या […]

Continue Reading 0
suspect

रमाबाईनगरमधून चोरट्याने मोबाईल पळवले; संशयित सिसिटीव्हीत कैद

पवई, आयआयटी येथील रमाबाईनगर येथील घरात घुसून दोन मोबाईल लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे पवईत घडली आहे. मोबाईल चोरी करून पसार होणारा हा संशयित चोरटा येथील सिसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरु आहे. अशा प्रकारे घरात घुसून चोरी करणारी टोळीच परिसरात कार्यरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गणेश गायकवाड हे आयआयटी येथील रमाबाईनगर येथे […]

Continue Reading 0
TAB-HACK-POWAI-POLICE

टॅब हॅक झाल्याने इव्हेंट कंपनीला २ लाखाची चपराक

पवईतील एका इव्हेंट कंपनीला २ लाखांचे मोबाइल बिल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्राहक नोंदणीसाठी असलेल्या टॅबमधून जपानी आणि कोरियन भाषेत सुमारे २१ हजार संदेश पाठवण्यात आल्यामुळे हॅकिंगचा संशय व्यक्त होत आहे. कंपनीच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पवईत कार्यालय असणाऱ्या एका इव्हेन्ट कंपनीने […]

Continue Reading 0
2

हिरानंदानीत बिजनेस पार्कच्या मिटर रूमला आग, अग्निशमन अधिकारी जखमी

पवई, हिरानंदानीतील केसिंग्टन बिजनेस पार्कच्या तळमजल्यावर असणाऱ्या मीटर रूमला आग लागल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ बंबांच्या साहय्याने १ तासानंतर संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग विझवण्याचे काम सुरु असताना विक्रोळी अग्निशमन विभागाचा एक कर्मचारी आगीच्या दाहामुळे किरकोळ जखमी झाला असून, उपचारानंतर […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या मास्टरमाईंडला बँगलोरमधून अटक

मेडिकल कॉलेजेसना ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घालणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्यासह साथीदाराला पवई पोलिसांनी बँगलोर येथून अटक केली आहे. श्याम हरिप्रसाद यादव उर्फ आर के सिंह (३६) राहणार ओशिवरा आणि त्याचा साथीदार आनंद चांगदेव आघाव (३२) राहणार पंचकुटीर,पवई अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अभिषेक सिंग याचा पोलीस शोध घेत असून, ऑगस्ट महिन्यात […]

Continue Reading 0
powai-thief-broken-car-windows-and-stolen-cash-and-valuables

पवईत चोरट्यांचा सुळसुळाट; गाड्यांच्या काचा फोडून ५ लाखांची चोरी

आयआयटी पवई येथील मॅरेथॉनवेळी १२ गाड्या फोडून चोरीच्या घडलेल्या गुन्ह्याचे काहीच धागेदोरे हाती लागले नसतानाच, पवईत पुन्हा गाडीच्या काचा फोडून ५ लाखांपेक्षा जास्तीच्या रक्कमेच्या चोरीचा गुन्हा घडला आहे. हिरानंदानीतील वेरोना फ़ाऊंटन येथे दोन तर नोरिटा बस स्टॉप येथे हे गुन्हे घडले आहेत. परिसरात मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पवई पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे. पाठीमागील महिन्यात […]

Continue Reading 0
hatya

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा दगडाने ठेचून खून, आरोपीला अटक

दारू पिताना दोघांच्यात झालेल्या किरकोळ वादात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. गणेश प्रधान (२८) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, शनिवारी पवई पोलिसांनी त्याचा मित्र संदेश धिंग्रा याला गुन्ह्यात अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!