दुर्घटनेच्या ठिकाणी त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलचे कंत्राटदार एल ऍण्ड टी आणि एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष पाठीमागील आठवड्यात मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. यावेळी अंधेरी (पूर्व) येथील सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत पडून पवईतील रहिवाशी विमल अपाशा गायकवाड (४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संदर्भात मृत महिलेच्या नातेवाईकांनी याची उच्चस्तरीय चौकशी […]