एकीकडे कोविड -१९ सारखा साथीचा आजार जनजीवन उध्वस्त करीत आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर काहींनी घरातील कमावता माणूसच गमावला आहे. अशात पवई स्थित शैक्षणिक कार्य करणारी स्वयंसेवी संस्था विद्या मुंबई अशा कुटुंबाला किराणा सामान आणि शिजवलेले अन्न वाटप करत आधार देण्याचे काम करत आहे.
कोरोनामुळे सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील बेरोजगारांमध्ये, स्थलांतरित कामगार आणि इतर असुरक्षित गटांची साथीच्या आजाराच्या दुसर्या वर्षात आर्थिक स्थिती बिघडत दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशावेळी विद्या मुंबईने त्यांच्या देणगीदार आणि भागीदार संस्थेच्या सहकार्याने मार्च २०२० पासून पोलिस, रूग्णालयातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कामगार आणि चैतन्यनगर, गौतमनगर आणि रमाबाई नगर यासारख्या चाळसदृश्य लोकवस्तीत राहणाऱ्या झोपडपट्ट्यांमधील लोकांना ५००० पेक्षा जास्त किराणा किट, एक हजार पीपीए किट्स, मास्क आणि सॅनिटायझर्स वाटप केले आहे. शिवाय सध्या सुरु असणाऱ्या ‘लर्न फ्रॉम होम’साठी २००० डिजिटल उपकरणे दान केली आहेत.
No comments yet.