नवतरूणांची संघटना म्हणून कार्यरत असणाऱ्या युथ पॉवर संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पवईत संपन्न झाले. दैनंदिन काम करून घरातील उदरनिर्वाह चालवणाऱ्या कष्टकरी नाकाकामगार बांधव यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
नागरिकांच्या पॉकेटमध्ये बसेल अशी ही मिनी दिनदर्शिका असून, महापुरूषांचे कार्य तसेच इतर माहीती, तारीख वेळेनुसार या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. पवईतील चैतन्यनगर परिसरात असलेल्या कामगारांच्या नाक्यावर सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी युथ पॉवरचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विरेंद्र धिवार यांच्या हस्ते सर्व नाका कामगारांना या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
No comments yet.