Tag Archives | accuse

arrest

डोक्यात हातोडी घालून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक

पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. अजित नारायण लाड (६७) असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्यांच्यावर त्याची पत्नी शिला अजित लाड (६५) हिची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता १९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत महिलेचा राहत्या घरात खून; पती बेपत्ता

पवईतील शिवशक्तीनगर येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला शीला अजित लाड यांचा अज्ञात व्यक्तीने तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांना तिच्या नवऱ्याने लिहलेली सुइसाईड नोट मिळून आली असून, तो बेपत्ता आहे. या संदर्भात पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. गारमेंट कामगार […]

Continue Reading 0

पॅसेंजर म्हणून प्रवास करून पवईत रिक्षावाल्यांना लुटणारी टोळी गजाआड

पवई, साकीनाका भागात रात्रीच्या वेळी रिक्षात प्रवास करून रिक्षाचालकांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांच्या अजून एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. इम्रान पिरमोहम्मद शेख (वय २१ वर्षे), शिवम उर्फ गुड्डू ब्रम्हदेव झा (वय २० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाहिजे आरोपी युनुस उर्फ शेरू जावेदअली सैयद याचा […]

Continue Reading 0
court-1234

केटामाईन तस्करी प्रकरण: ७ आरोपी दोषी, पवईतील दोन आरोपींचा समावेश

केटामाईनच्या तस्करी प्रकरणी जळगाव जिल्हा तसेच सत्र न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी ठरविले आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींमध्ये २ पवईतील आहेत तर १ विक्रोळी भागातील. ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाठीमागील ५ वर्षांपासून जळगाव न्यायालयात हा खटला सुरू होता. दोषी आरोपींना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. […]

Continue Reading 0
kidnap school

पवईत शाळेजवळ विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न?

पवई आयआयटी येथील एका नामांकित शाळेबाहेरून एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी पवईत घडली. याबाबत शाळा प्रशासनाने पवई पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई, आयआयटी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकणार अनिकेत (बदलेले नाव) हा दुपारी १२.४५ वाजता शाळा सुटल्यानंतर आपल्या […]

Continue Reading 0

आयआयटी येथील हर्बल कंपनीच्या कार्यालयात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक

आयआयटी, पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून, मँनेजरला बांधून ठेवून त्याच्याकडून ९.५० लाखाची जबरी चोरी करून फरार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. रेहमत मोहमद अली (२१) आणि शिवकुमार प्रताप सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६.३५ लाखाची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. रेहमत अली […]

Continue Reading 0
sakinaka kidnaping cctv

अडीच वर्षाच्या मुलीच्या अपहरणकर्त्याला साकीनाका पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या

शुक्रवारी संध्याकाळी साकीनाका येथे आपल्या वडिलांच्या मिठाई दुकानाबाहेर खेळत असणाऱ्या, अडीच वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या २८ वर्षीय इसमाचा साकीनाका पोलिसांनी सहा तासाच्या आत पत्ता लावत बेड्या ठोकल्या आहेत. संदिप शशिकांत परब असे अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव आहे. अडीच वर्षीय शिरीन फातिमा शुक्रवारी संध्याकाळी ३.२५ वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या मिठाईच्या दुकानाबाहेर खेळत होती. “ती अचानक दिसायची […]

Continue Reading 2
sai bangurda murder

साई बांगुर्डा खून प्रकरणात आरोपीला अटक

पवईतील साई बांगुर्डा येथे मित्राचा खून करून पसार झालेल्या मित्राला अखेर पवई पोलिसांनी आज अटक केली. जीवन रवी मोरे (४०) असे अटक आरोपीचे नाव असून, उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. पवईमधील गौतमनगर येथे राहणारा दिनेश लक्ष्मण जोशी (३०) आपला मित्र जीवन मोरे सोबत गुरुवारी साई बांगुर्डा येथील स्काऊट गाईडच्या बंद असणाऱ्या इमारतीमध्ये पार्टी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!