माननीय सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघातांसाठी महामार्गावरील दारुविक्री करणारे हॉटेल, बार यांना जबाबदार धरले. महामार्गांलगत असलेले सर्व बार आणि दारु विक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश.
त्यातल्या काही हास्यास्पद तरतुदी
१) महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर कोणत्याही मद्यविक्रीस बंदी.
२) ज्यांचे परवाने अजून संपायचे आहेत त्यांनाच परवानगी चालू.
३) १ एप्रिल पासून कोणत्याही नवीन परवान्यास मान्यता नाही.
४) जुन्या परवान्यांचे नुतनीकरण बंद.
५) २ एप्रिल पासून सर्व महामार्गावरील सर्व Dink & Drive चे अपघात बंद होणार.
सुप्रीम कोर्टाने सरसकट देशभरात दारूबंदी लागू करा असा नियम करायला काहीच हरकत नव्हती.
या अर्धवट निर्णयाने ५०१ मीटर वर असलेल्या दारु दुकानातून किंवा बारमधून दारु पीऊ शकता.
बर या निर्णयामुळे जे लाखो बेकार होणार आहेत त्यांचे काय?
तर तुम्ही घरोघरी जावून दारु विका. असाही हासास्पद निर्णय सुनावला.
आज महाराष्ट्रातील गुटखाबंदीने गुटखा माफियांचे काय वाकडे झाले ? लोक थांबले का गुटखा खायचे?
दारु पीऊन गाडी चालवणारा महामार्गावर दारु मिळत नाही म्हणून घरुनच दारु पिऊन निघाला तर त्याला पकडणार कसे?
_ ते पहा न्यायमूर्ती साहेब धावत आहेत प्रत्येक बेवड्या ड्रायव्हर पाठीमागे (त्या पदाची माफी मागून)
एकूण काय? अभ्यासपूर्ण लिहावे म्हणून विचार होता. पण हे आहेच ईतक हास्यास्पद की खोलवर अभ्यास करुन काय दगडधोंडे हाताला लागणार?
असो..
बेरोजगारी अजून भरपूर वाढणार आहे. राज्य सरकारने त्यांचा अखत्यारीत काही निर्णय असतील तर जरुर राबवावेत.
@परीस (दगडाचे सोने करणार)
No comments yet.