दैनिक ‘तरूण भारत संवाद’ या वृत्तपत्राचे उपसंपादक आणि पवईकर राम खंदारे यांचे वडिल महीपत खंदारे यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते.
नातलगांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून ते आजारी होते, रत्नागिरीच्या कणकवली येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांनी आपल्या राहत्या घरी (कणकवली, रत्नागिरी ) अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पाश्चात पत्नी, मुले, मुली, सुन आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी मूळगावी कणकवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments yet.