पवईत सख्या बापानेच केला आपल्या मुलीवर अत्याचार

@अविनाश हजारे, रविराज शिंदे

राधम सख्या बापानेच आपल्या ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पवईतील इंदिरानगर परिसरात घडली. विलास गायकवाड (३६ वर्षे) असे या नराधमाचे नाव असून,”पोस्को” कायद्यांतर्गत व भादवि कलम ३५४ नुसार गुन्हा नोंदवत पार्कसाईट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी गायकवाड हा आपल्या कुटुंबासोबत पवईच्या देवीपाडा-इंदिरानगर परिसरात आपल्या बायको-मुलांसोबत राहायला आहे. नशेच्या आहारी गेला असल्यामुळे तो सतत घरीच असतो, तर पत्नी शेजारील परिसरात घरकाम करते. पत्नी कामावर गेल्यानंतर गायकवाड आणि त्याची मुलगी संपदा (बदललेले नाव) हे दोघेच घरी असत.

“घरात बायको नसल्याचा फायदा घेत गायकवाडने गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी लगट करत लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. तिला हा सगळा प्रकार विचित्र वाटू लागल्याने पिडीत मुलीने आपल्या आईला याबाबतची सर्व हकीकत सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने पार्कसाईट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. ज्याच्या आधारावर आम्ही आरोपी विलास गायकवाड याला अटक केली आहे” असे यासंदर्भात बोलताना पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संतापाचे वातावरण असून, नराधम बापाला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!