फुलेनगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणाचा शुभारंभ

@रविराज शिंदेfulenagar putla renovation

हात्मा फुलेनगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नवरंग क्रीडा मंडळाच्या पाठपुराव्यामुळे अखेर याला चालना मिळाली असून, स्थानिक आमदार अशोक पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून गेल्या आठवड्यात पुतळा परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

येथील स्थानिक व रिपाइं मुंबई संघटक दिलीप हजारे यांच्या हस्ते १९९३ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा महात्मा फुलेनगरमध्ये बसविण्यात आला होता. स्थानिक प्रतिनिधींच्या याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पुतळा परिसरात घाण, कचऱ्याचे साम्राज्य पसरलेच होते. अंधाराचा फायदा घेत दारू पिणे, नाशखोरी व जुगार खेळण्यासारखे प्रकार सुद्धा येथे घडत होते. यासंदर्भात येथील स्थानिकांनी लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार करत पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्याची मागणी केली होती. मात्र याची त्यांच्याकडून गांभीर्याने दखल घेतली जात नव्हती.

नवरंग क्रीडा मंडळाच्यावतीने सुशोभिकरणाच्या मागणीचा पाठपुरावा स्थानिक आमदार अशोक पाटील यांच्याकडे केला जात होता. ज्याची दखल घेत आमदार निधीमधून पुतळा परिसर सुशोभिकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सोमवारी आमदार अशोक पाटील व स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी फुलेनगरमधील स्थानिक रहिवाशांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!