लवकरच सुटणार संपूर्ण आयआयटी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
आयआयटी | अविनाश हजारे
आयआयटी भागात येणाऱ्या गढूळ व दुषित पाण्याच्या प्रश्नावर झालेल्या पाहणीनंतर, कामाचा पहिला टप्पा म्हणून पालिकेतर्फे मारुतीनगर येथील गंजलेली जलवाहिनी काढून नविन जलवाहिनी टाकण्यात आली. पहिल्या टप्यात किमान मारुतीनगरच्या नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तरी सुटलेला आहे. येत्या काही दिवसात इतरही ठिकाणी जलवाहिनी बदलून किंवा दुरुस्ती करून पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
गेली अनेक वर्ष महापालिकेच्या जलवाहिन्यांमार्फत आयआयटी येथील भागात अस्वच्छ, गढुळ व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. गंजलेल्या, तुटलेल्या जलवाहिनीतून पाणी रस्त्यांवर वाहून जात असल्याने पाण्याचा तुटवडा भासत होता. याबाबत स्थानिकांकडून होणाऱ्या सततच्या तक्रारींची व स्थानिक शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत पालिकेचे जल-अभियंता मा. तवारीया, स्थानिक आमदार सुनिल राऊत, माजी महापैार दत्ता दळवी व सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी परिसरातील भागांची पाहणी केली होती. पाहणीत त्यांना अनेक भागात पाणी टंचाई व गंजलेल्या जलवाहिन्यांमधून गढुळ व अस्वच्छ पाणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. हे दुषित पाणी अनेक ठिकाणी आजारास कारणीभूत ठरत असल्याने, लवकरात लवकर ठिकठिकाणी जलवाहिनी बदलण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले गेले होते.
मंगळवारी पालिकेतर्फे मारुतीनगर येथील गंजलेली जलवाहिनी काढून नविन जलवाहिनी टाकण्यात आली. यावेळी स्थानिक आमदार सुनिल राऊत, उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव, शाखाप्रमुख निलेश साळुंखे, माजी शाखाप्रमुख उदय शिर्के, महिला शाखा संघटक सुरेखा चव्हाण, गोपाळ भिवंदे आदि उपस्थित होते.
?? nice work….