बांधकाम साईटवर सुरक्षारक्षकाचा २० फुट खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू

प्रातिनिधिक

णेशनगर, पंचकुटीर भागात चालू असणाऱ्या बांधकाम साईटवर ५५ वर्षीय सुरक्षारक्षकाचा २० फुट खोल खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्वनाथ वामन शेंडगे (५५) असे मृत्यू पावलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवून, पवई पोलिसांनी अग्निशमन दलाच्या साहय्याने जखमीला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यू नोंद केली असून, शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पाहत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचकुटीर भागात हिरानंदानी विकासकाच्या एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या साईटवर विश्वनाथ हे गेटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. गुरुवारी दिवसभर काम केल्यानंतर, कामगार निघून गेल्यावर, रात्री पुन्हा ते साईटवर ड्यूटीसाठी थांबले होते. शुक्रवारी सकाळी कामगार जेव्हा पुन्हा कामावर आले तेव्हा त्यांना विश्वनाथ हे खड्यात पडलेले आढळून आले.

याबाबत माहिती मिळताच पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सैद, पोलीस निरीक्षक घावटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हाडेश्वर व सहाय्यक पोलीस आयुक्त समद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या माध्यमाने जखमीला बाहेर काढून राजावाडी हॉस्पिटलला पाठवले असता तो मृत असल्याचे घोषित करण्यात आले.

याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांनी सांगितले, “मृतव्यक्ती दिवसपाळी करून रात्रपाळी कामासाठी थांबला होता. रात्री सर्व कामगार निघून गेल्यावर झोपण्यासाठी गेला असताना इमारत बांधण्यासाठी खोदलेल्या २० फुटाच्या खड्यात त्यांचा तोल जाऊन पडून मृत्यू झाला आहे. याबाबत आम्ही अपमृत्युची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे नक्की कारण समजू शकणार आहे”

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!