सिंदुर खेला, उत्सव सौभाग्याचा

sindur khela1के काळी केवळ कलकत्ता पर्यंत मर्यादित असणारी दुर्गापूजा, आज कामानिमित्त विविध शहरात स्थायिक झालेल्या बंगाली लोकांमुळे जगभर पोहचलेली आहे. नवरात्रीच्या शेवटच्या पाच दिवसात साजरा होणाऱ्या या उत्सवात शष्टीपासूनच धूम असते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या उत्सवात खास आकर्षण असते ते ढाकीच्या तालावर होणारा ‘धुनुची नाच’ आणि दसऱ्याच्या दिवशी दुर्गामातेच्या विसर्जनापूर्वी सुवासिनींनी मिळून खेळला जाणारा ‘सिंदुर खेला’.

सुहासिनी महिला प्रथम दुर्गामातेला सिंदुर लावून, मग उपस्थित महिला एकमेकींना सिंदुर लावून हा उत्सव साजरा करतात. बांगला संस्कृतीमध्ये याला शुभ मानले जाते. एकमेकींना सिंदुर लावण्यासोबतच महिला एकत्रितरित्या ढाकच्या तालावर नाच करत, दुर्गामातेकडे सकल समाजाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करतात. सिंदुर हे सौभाग्याचे प्रतिक असते, तेव्हा एकमेकींना सिंदुर लावून त्या एकमेकींना सदा-सौभाग्यवती राहण्याच्या शुभेच्छा देतात.

पवई बेंगाली वेल्फेअर असोसिएशनचा ‘पवई सार्वजनिण दुर्गोत्सव’ आणि स्पंदन फाऊन्डेशनचे ‘शारदोत्सव २०१५’ अशा दोन्ही ठिकाणी गुरुवारी विजयदशमीच्या दिवशी महिलांनी ‘सिंदुर खेला’ खेळत एकमेकींना सदा-सौभाग्यावती राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना महिलांनी सांगितले, “माता दुर्गा ही पाच दिवसासाठी आपल्या माहेरी आलेली असते. या पाच दिवसात आम्ही तिला खावू घालतो, तिची सेवा करतो, तिला  भरभरून देण्याचा प्रयत्न करतो. विजयादशमीच्या दिवशी ती आपल्या माहेरी पुन्हा जायला निघालेली असते, तेव्हा तिचा संपूर्ण पाहुणचार झाल्यावर तिला सिंदुर लावून गोडधोड खायला घातले जाते. यादिवशी आम्ही तिच्यासाठी खास दहीकर्मा मिठाई बनवतो. तिच्या समोर नाचून गाऊन एकमेकीना सिंदुर लावून सदा-सौभाग्यवती राहण्याच्या शुभेच्छा देतो.”

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!