माझ्या प्रत्येक कृतीतून मला फायदा कसा होईल, या विचाराने वागणाऱ्या समाजात. आपल्याला प्रत्येक कार्यात मदत करणाऱ्या, गरीब आणि गरजू अशा घरकाम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचा परिवार, अनाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम, पवईमधील रहेजा येथील सुकृतः ही संस्था करत आहे. एवढ्यावरच न थांबता ही संस्था, या लोकांसाठी चांगले काहीतरी करा म्हणून लोकांना प्रोत्साहित सुद्धा करत आहे. सध्या दर गुरुवारी अनुष्का क्लिनिक, क्रिस्टल सेंटर, रहेजा विहार येथे गरजू गरीब लोकांसाठी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत या संस्थेतर्फे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत.
संस्थेने याविषयी बोलताना सांगितले “आमचे प्रमुख उद्देश हे, आम्हा सर्वांसाठी दिवसरात्र मदतनीस म्हणून झटणाऱ्या गरीब घरकाम करणाऱ्या बायका, सुरक्षारक्षक, चालक, तसेच एक ना अनेक मार्गाने मदत करणारे पण योग्य सुविधा घेण्यास सक्षम नसणारे, पवई आणि आसपासच्या परिसरात व रस्त्यावर राहणाऱ्या गरीब गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा देणे, त्यांच्या मुलांना चांगली शैक्षणिक सुविधा देणे आहे. आम्ही वैद्यकीय सुविधेसाठी प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टरांची एक टीम तयार करून रुग्णसेवा पुरवत आहोत. आतापर्यंत आम्ही जवळपास ३० तासा पेक्षा जास्त काळ क्लिनीक चालू ठेवून ४०० पेक्षा जास्त रुग्णांना वैद्यकीय सुविधा दिलेल्या आहेत. पवईच्या इतर परिसरात सुद्धा क्लिनिक सुरु करण्याच्या तयारीत असून, अजून डॉक्टर्स आणि मदतनिसांच्या शोधात आहोत. सोबत आम्हास आर्थिक मदत पुरवणाऱ्या देणगीदार आणि देणगीची सुद्धा आवश्यकता आहे.
चांदिवली येथील संघर्षनगर परिसरात राहणारी १६ वर्षीय निशा यादव (बदललेले नाव), हिने या बद्दल बोलताना सांगितले, “सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या माझ्या वडिलांनी मला झालेल्या त्वचेच्या संसर्गासाठी, हजारो रुपये खर्च केले पण फरक पडत नव्हता. आम्हाला या क्लिनिक बद्दल माहिती पडल्यापासून मी या क्लिनिकला ३ वेळा भेट दिली आहे. इथे मला मोफत औषध आणि मार्गदर्शनच मिळाले नाही तर, मला असलेल्या त्वचेच्या संसर्गात सुद्धा फरक पडला आहे आणि सध्या मला खूप बरे वाटतेय. मी त्यांचे आभार कसे मानू हेच मला कळत नाही आहे.”
याबाबत बोलताना डॉक्टर कीर्ती अग्रवाल आणि सह संस्थापक सुरिंदर गुप्ता म्हणाले “आम्ही सुकृतः फाऊन्डेशन यामुळे खूप आनंदी आहोत. निशा सारख्या एका गरीब गरजू मुलीला दिलेल्या वैद्यकीय सुविधेमुळे, ती बरी झाली आहे आणि समाजात ताठ मानेने फिरू शकते, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्हाला या कार्यात साथ देणाऱ्या लोकांचे आम्ही खूप आभारी आहोत. अशा गोष्टी आम्हाला आमचे कार्य अजून जोमाने करण्यास प्रेरणा देत आहेत.”
अधिक माहितीसाठी या संस्थेला आपण ९७६९७७८८८४ किंवा [email protected] वर संपर्क साधू शकता. किंवा वेबसाईट www.sukrta.org वर भेट देवून अधिक माहिती जाणून घेवू शकता.
No comments yet.