पवईकरांचे हरवलेले १८ महागडे मोबाईल फोन परत मिळवण्यात पवई पोलिसांनी यश संपादन केले असून, ते सर्वच्या सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले.
अन्न, वस्त्र आणि निवारा इतकीच मोबाईल सुद्धा आता माणसाची गरज बनून राहिली आहे. मात्र अनेकदा मुंबईकर आपली ही गरज असणारा मोबाईल फोन कळत न कळत कोठेतरी विसरतात, गहाळ करतात किंवा चोरी होतात. असेच हरवलेले १८ फोन पवई पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून काढत मूळ मालकांना परत केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापसे, सहाय्यक फौजदार मिलिंद राणे, पोलीस नाईक राजेंद्र देशमुख, पोलीस शिपाई प्रदीप जानकर, पोलीस शिपाई नवनाथ जावळे यांनी आयएमआय नंबर आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर मोबाईल ट्रेस करून त्यांना हस्तगत केले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग रमेश नांगरे यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले.
११७ गहाळ फोन परत मिळविले
मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात विविध ठिकाणी मालकांनी नकळत मागे विसरलेले १०० पेक्षा अधिक फोन देशातील विविध राज्यांमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. परिमंडळ दहाचे पोलिस उपायुक्त महेश रेड्डी यांनी सांगितले की, “पोलिसांनी परत मिळवलेल्या लोकांच्या या फोन्सची एकूण किंमत अंदाजे १७,५५,००० रुपये एवढी आहे.”
एमआयडीएसमधून एकूण ६५ फोन, अंधेरी २३, पवई येथील १८ आणि मेघवाडी येथील १३ फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी आहेत. लोकांकडून सन २०१९-२०च्या दरम्यान या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र आणि इतर राज्यातून हे मोबाईल पोलिसांनी मिळवले आहेत.
18 misplaced phones recovered, returned to owners
“Phones that had been left behind unknowingly by owners in various places in the powai area were recovered by police from several states and returned to owners”, a senior official said.
“18 phones which were recovered by police, complaints were lodged by people between 2019-20. They were recovered from Maharashtra and other states,” said powai police.
Assistant commissioner of police (Sakinaka division) Ramesh Nangre returned these mobiles to their rightful owners.
No comments yet.