पवईस्थित वकील ८० वर्षीय उषा जोशी पाठीमागील एक दशकांपासून तरुणांना तोंडात बोटे घालायला लावत असून, या वर्षीच्या पवई रन २०२५मध्ये १० किमी शर्यतीत सहभागी होण्यासाठी त्या पूर्णपणे सज्ज आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या माजी संशोधन प्रमुख जोशी एक शास्त्रज्ञ-सह-उद्योजक असून, सध्या कायद्याचा अभ्यास करत आहेत.
मुलं स्थिर स्थायिक झाल्यावर, निवृत्तीनंतर स्वतःला पुन्हा नव्याने शोधण्यासाठी आणि सदृढ शरीरासाठी पुढे पाऊल टाकणाऱ्या जोशी यांचा फिटनेस प्रवास २५ वर्षांपूर्वी पवईच्या निसर्गमय वातावरणात सुरु झाला. सुरुवातीला चालत या निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेणाऱ्या जोशींनी लवकरच धावायला देखील सुरुवात केली.
आपल्या धावण्याच्या छंदाला पुढे घेवून जाताना त्यांनी एक दशकापूर्वी लांब पल्ल्याच्या धावण्याच्या मूलभूत गोष्टींचे स्ट्रायडर्स समुदायासोबत प्रशिक्षण घेतले, ज्याचा त्या आजही एक भाग आहेत. तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून न-पाहता अनेक धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.
त्यांना त्यांच्या या वयात लांब-लांब पल्यांच्या शर्यतीत धावण्याची प्रेरणा कशामुळे मिळते? असे विचारले असता त्या म्हणतात, “मला माझ्या तरुण सहकाऱ्यांसोबत माझे सर्वोत्तम देणे आणि अनुभवणे आवश्यक वाटते. मला माझ्या वयामुळे अशा संधी गमवायच्या नाहीत.”
यापूर्वी ५ वेळा पवई रनमध्ये भाग घेतल्यानंतर, २०२५ ही त्यांची शेवटची पवई रन असावी असे त्यांना वाटत असले तरी कदाचित सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे.
५ जानेवारीला पवई रनमध्ये ८० वर्षीय उषा जोशी यांच्यासह अनेक फिटनेस प्रेमी आणि आनंद घेणाऱ्या धावपटूना प्रत्यक्ष पाहण्याची संधी गमावू नका. अधिक तपशीलांसाठी भेट द्या: https://powairun.com/
No comments yet.