भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन पवईमध्ये मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी ध्वजारोहणासह एकता आणि समुदायाचा सहभाग अधोरेखित करणारे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र या सर्वात आकर्षण ठरले ते मुंबई पोलिसांच्या शौर्याला आणि कामाला चित्रपटातून दर्शवणारे चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी रिअल लाईफ सिंघम पवई (मुंबई) पोलिसांसोबत यावर्षीचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
यावेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यासोबत, फिजिओथेरपिस्ट डॉ. देशमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाच्या उत्सवाची पवई परिसरातील सुरुवात रामबाग येथील पवई पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहणाने करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुणे रोहित शेट्टी आणि डॉ. देशमुख यांच्या हस्ते विविध गुन्ह्यांमध्ये कार्यतत्परतेने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना शेट्टी यांनी मुंबई पोलीस यांच्या अविरत कार्याबद्दल त्यांचे कौतुक करताना मुंबई पोलिसांमध्ये असणाऱ्या लाखो रिअल सिंघममुळेच मुंबई सुरक्षित असल्याबद्दल पोलिसांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मानासोबतच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांसोबत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजासाठी केलेल्या सकारात्मक योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
No comments yet.