ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये आर्या कताळेला २ सुवर्ण

ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये पवई इंग्लिश हायस्कूलच्या आर्या कताळेने २ सुवर्ण मिळवत पवईसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गुजरात येथे २४ सप्टेंबरला आर्मर मार्शल आर्ट्स गुज्जू कराटे असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शोटोकान या कराटे प्रकारात ब्लॅक बेल्ट गटात तिने पंच, किक आणि थ्रोचा वापर करून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत हे यश मिळवले आहे.

महाराष्ट्रासह, गोवा, गुजरात, पंजाब, हरयाणा, केरला, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटका, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातून १००० पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. आर्याने विविध राज्यातील प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत विजय मिळवित २ सुवर्णपदके आपल्या नावे केली. ती पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये दहावीत शिकत आहे.

शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्शल आर्टकडे लहानपणापासूनच वळलेल्या आर्याने शोटोकन सारख्या (कराटे) मार्शल आर्ट प्रकारात स्वत:च्या कामगिरीचा अल्पावधीतच ठसा उमटविला आहे. तिचे गुरु जयेश डिके यांच्याकडून ती पाठीमागील ५ वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे.

ब्लॅक बेल्टची (विशेष प्राविण्य प्राप्त असलेला खेळाडू) मानकरी असलेल्या आर्याने यापूर्वी देखील आयोजक, जिल्हास्तरीय आणि  विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवत अनेक पदके जिंकली आहेत.

आवर्तन पवईशी बोलताना ती म्हणाली, “इतर खेळाडूंमध्ये सुद्धा चपळता चांगली होती. त्यांच्या खेळाचे सूक्ष्म निरीक्षण करीत विजयासाठी मी काही डावपेच आखले. नेमके कसे खेळायचे यासाठी कोचशी चर्चा केली. या सर्व गोष्टींचा मला माझ्या यशात लाभ झाला.”

ती पुढे म्हणाली, “मुलींनी मार्शल आर्टसारख्या खेळात करियर करावे आणि समाजात खंबीरपणे वाटचाल करावी.” कराटे हा केवळ एक खेळ नसून त्याचे स्वयंरक्षणाकरिता प्रशिक्षण घेतले जाते. परिणामी ते आपला बचाव करतात, असा संदेश देण्यासाठी आपण काम करणार असल्याचेही आर्याने यावेळी बोलताना सांगितले.

शाळेतील क्रीडा शिक्षक सावी आरोटे आणि प्रदीप यादव यांचेही तिला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

यावेळी बोलताना पवई इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्या शर्ली उदयकुमार म्हणाल्या, “आमचे विद्यार्थी राज्य स्तरीय स्तरावर नाव कमावत आहेत याचा अभिमान आहे. आमची शाळा शिक्षणासोबतच मुलांच्या कलागुणांवर भर देण्यावर नेहमीच अग्रेसर आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!