आवर्तन पवई | हिरानंदानी सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि अभिनेते लेख टंडन यांचे आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पवई येथील एसएम शेट्टी शाळेजवळील राहत्या घरी निधन झाले, ते ८८ वर्षाचे होते. उद्या १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. लेख यांनी चित्रपट क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. स्वदेश, रंग दे बसंती, चेन्नई एक्स्प्रेस, आम्रपाली असे […]
Author Archive | आवर्तन पवई
शिव-भगतानी रोडला खड्डे; खाजगी रोड असल्याचे सांगत पालिकेचे दुर्लक्ष
आवर्तन पवई | पवई – चांदिवली चांदिवली आणि हिरानंदानी भागाला जोडणारा शोर्टकट रोड शिवभगतानी कॉम्प्लेक्समधून जात आहे. या रोडवरून होणाऱ्या मोठ्या वाहतुकीमुळे येथील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. कॉम्प्लेक्सची निर्मिती करणाऱ्या विकासकाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, रस्ता खाजगी असूूून विकासकाने पालिकेच्या स्वाधिन केला नाही असे सांगून पालिका याच्यातून हात […]
भाजप प्रवक्ताने विद्यार्थ्याबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याच्या विरोधात विद्यार्थ्यांची हॅशटॅग मोहीम
आवर्तन पवई | मुंबई मुंबई विद्यापीठाच्या पेपर पुनर्तपासणी निकालात होणाऱ्या दिरंगाई आणि विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल संजय पाटील या संतप्त विद्यार्थ्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना टॅग करून केलेल्या ट्वीटला भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी प्रतीउत्तरादाखल केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमावर हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत विद्यार्थी #लायकीनाही #अवधूतवाघ #विनोदतावडे असे […]
मोदी सरकारच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जन आंदोलन
मोदी सरकारच्या काळात जिवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज संध्याकाळी ५ वाजता विक्रोळी स्टेशन येथे जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजीपाल्यासह गॅसचे व पेट्रोलच्या वाढीव दरामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समर्थक आज रस्त्यावर उतरले होते. गेल्या आठवड्यात एलिफिस्टन रोड येथे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या घटनेतील […]
नगरसेविका वैशाली पाटील यांच्या प्रयत्नातून तिरंदाज पालिका शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरु
तिरंदाज व्हिलेज पालिका शाळेत इमारतीच्या स्लबचे पोपडे निघून पावसाळ्यात पाणी गळती होत होती. तसेच परिसरात शेवाळ तयार झाल्याने मुले घसरून पडण्याची शक्यता वाढली होती. याची दखल घेत स्थानिक नगरसेविका यांच्या प्रयत्नातून शाळा इमारत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये आधीच मुलांची संख्या कमी झाली होती त्यातच […]
स्वच्छ पवई अभियानाचे तिन तेरा, गोखलेनगरजवळ फुटपाथवर फेकला कचरा
कचरा उचलण्याचे काम करणारा जुना कंत्राटदार राजू आम्हाला त्रास देण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करत आहे – श्रीकांत पाटील (भाजप जेष्ठ कार्यकर्ते – वार्ड १२२) पवईमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ पवई अभियान या उपक्रमाला खोडा घालत पवईमध्ये घाण पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गोखलेनगर येथील एका पडक्या […]
पवई तलावात उडी मारून तरूणीची आत्महत्या
रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील रमाबाई आंबेडकरनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय तरूणीने पवई तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी ३ वाजता उघडीस आली आहे. ऐश्वर्या खंडागळे असे तरूणीची नाव असून, ती ज्ञान मंदिर शाळेत १० वीत शिकत होती. शुक्रवारी कोचिंग क्लासला जात आहे असे सांगून गेलेली एश्वर्या उशिरा पर्यंत घरी परतलीच नाही. घरातील […]
पत्रकार राम खंदारे यांना पितृशोक
दैनिक ‘तरूण भारत संवाद’ या वृत्तपत्राचे उपसंपादक आणि पवईकर राम खंदारे यांचे वडिल महीपत खंदारे यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. नातलगांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून ते आजारी होते, रत्नागिरीच्या कणकवली येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांनी आपल्या राहत्या घरी (कणकवली, रत्नागिरी ) अखेरचा श्वास घेतला. […]
बिहटा हत्या प्रकरणातील “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना पवईमध्ये अटक
पटना बिहटा येथील चित्रपटगृह मालक निर्भय सिंघ यांची गोळ्या घालून हत्या करून फरार झालेल्या “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना आज (शनिवारी) पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तुंगा येथून अटक करून पटना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बिहाट, पटना येथील नामांकित व्यक्तिमत्व आणि येथील उदय चित्रमंदिर सिनेमा हॉलचे मालक निर्भय सिंघ यांची चित्रपटगृहाच्या समोर मोटारसायकलवरून आलेल्या काही अज्ञात […]
चांदिवलीतील पवार पब्लिक शाळेतील विद्यार्थ्याचा पडून मृत्यू
गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीत आपल्या मित्रांसोबत खेळत असताना चांदिवलीतील पवार पब्लिक शाळेत पहिलीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पडून मृत्यू झाला. स्वरांग दळवी (६) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचे वडील भांडूपच्या शाळेत संगीत शिक्षक आहेत. “स्वरांग हा आपल्या शालेय मित्रांसोबत मधल्या सुट्टीत शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत होता. खेळत असताना अचानक तो पडल्याची माहिती […]
एनएसजी कमांडोच्या घरातून रिव्हॉल्व्हर, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना अटक
मि लिंदनगर म्हाडा येथील इमारतीत राहणारे एनएसजी कमांडो संदिप पानतावणे (३२) यांच्या घरात घुसून, चोरी करून त्यांची वैयक्तिक रिव्हॉल्व्हर, २० जिवंत काडतूस, ३ तोळे सोने आणि चार हजाराची रोकड लंपास करणाऱ्या दोन चोरांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. शमिम सलिम शेख (२३) आणि सादिक अक्कानी शेख (२३) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून, […]
वीजबिल भरणा केंद्र बंद केल्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, सह्यांची मोहीम
आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या […]
पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अफवा कि सत्य?
कालपासून सोशल मिडियावर पवई तलावातून एक मगर बाहेर आल्याची बातमी व्हायरल होत आहे. मात्र या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आवर्तन पवईने जेव्हा पवई पोलीस, प्राणीमित्र संघटना ‘पॉज मुंबई’ आणि वन विभाग यांच्याशी संपर्क साधला तेव्हा यातील कोणाकडेही पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अधिकृत तक्रार किंवा माहिती कळवण्यात आलेली नसल्याचे या सर्वांनी स्पष्ट केले. काल जोरदार […]
पवई तलावावर गणेश विसर्जनाचे थांबलेले कार्य पूर्ववत
मुंबईत आज सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पवई तलावात सुरु असणारे गणेश विसर्जन काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर ओसरताच पवई तलावातील विसर्जन कार्य पूर्ववत झाले आहे. शुक्रवारी विराजमान झालेल्या गणेशांपैकी पाच दिवसांच्या गणपतींचे आज ठिकठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील अनेक गणेशांचे पवई […]
चांदिवली इमारत दुर्घटना: मृतांची संख्या चार, बचावकार्याला गती
शनिवारी चांदिवली, संघर्षनगर येथे इमारत पडण्याचे काम सुरु असताना झालेल्या दुर्घटनेत त्याच दिवशी एकाचा मृत्यू झाला होता. रविवारी रात्री ढिगाऱ्याखालून काढलेल्या अजून एक कामगाराचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सोमवारी बचाव पथकाच्या हाती अजून दोन कामगार लागले असून, त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता चार झाली आहे. सोमवारी संध्याकाळी बचावकार्य सुरु असताना […]
चांदिवली इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या दोनवर; सततच्या पावसामुळे बचावकार्य संथगतीने
चांदिवली, संघर्षनगर येथील क्रिस्टल पार्क या इमारतीला पाडण्याचे काम सुरु असताना शनिवारी झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता दोन झाली आहे. बचावकार्य करणाऱ्या पथकाला सोमवारी रात्री २.४० वाजता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांपैकी अजून एकाला बाहेर काढण्यात यश आले. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवल नाईक (२२) असे या […]
चांदिवलीत इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, दोन जखमी, बचावकार्य सुरु
चांदिवली, संघर्षनगर बस स्टॉपजवळील कृष्णा बिसनेस पार्क या इमारतीला पाडण्याचे काम सुरु असताना इमारतीचा वरील माळ्यांचा काही भाग कोसळल्याची घटना आज (शनिवारी) संध्याकाळी घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली अजून ४ ते ५ लोक अडकल्याची शक्यता असून, अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे. […]
खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
फिल्टरपाडा येथील दुकानदारांने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याला जबर मारहाण करून त्याच्या दुकानाचे नुकसान करणाऱ्या खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शोयब अमीर खान (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शकील शेख यांचे फिल्टरपाडा येथे सना इंटरप्रायजेस नामक दुकान आहे. आरोपी […]