दिग्दर्शक अभिनेते लेख टंडन यांचे पवई येथील राहत्या घरी निधन

आवर्तन पवई | हिरानंदानी

सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि अभिनेते लेख टंडन यांचे आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पवई येथील एसएम शेट्टी शाळेजवळील राहत्या घरी निधन झाले, ते ८८ वर्षाचे होते. उद्या १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

लेख यांनी चित्रपट क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. स्वदेश, रंग दे बसंती, चेन्नई एक्स्प्रेस, आम्रपाली असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केले आहे. फिर वही तलाश आणि फरमान सारख्या टीव्ही मालिका सुद्धा त्यांनी भारतीय रसिकांना दिल्या आहेत.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या वाटचालीची सुरुवात करणारे लेख टंडन यांनी पुढे दिग्दर्शनासह कलाकार म्हणूनही अनेक चित्रपटात काम केले आहे. चेन्नई एक्स्प्रेस हा त्यांनी काम केलेला शेवटचा चित्रपट.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!