खदानीत सापडला तरुणाचा मृतदेह

रविराज शिंदे

dumpमंगळवार पासून गायब असणाऱ्या पवईतील एका वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हनुमान नगर येथील खदानीत शुक्रवारी पहाटे सापडला असून, त्याची हत्या कि आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. सोनू पांडियन (२०) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पवईतील महात्मा फुले नगरमधील रहिवाशी आहे.

पवईतील महात्मा फुले नगरमध्ये आपल्या ३ भावंडासह राहणारा सोनू कचरा वेचण्याच काम करत होता. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे कचरा वेचण्यासाठी तो घराबाहेर पडला, मात्र त्या दिवसानंतर सोनू पुन्हा घरी परातलाच नाही. रात्री उशिरापर्यंत घरी न परतलेल्या सोनूचा परिवारांच्या सदस्यांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. शेवटी स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांनी सोनू हरवल्याची तक्रार दिली होती.

शुक्रवारी सकाळी हनुमान नगर येथील खादानात कचरा वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेस तिथे कोणाचा तरी मृतदेह असल्याचे आढळून आले. माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढून, राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सोनूच्या परिवाराने सदर मृतदेह हा सोनूचाच असल्याचे ओळख पटवली असून, त्याची हत्या कि आत्महत्या याचा भांडुप पोलीस तपास करत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!