Archive | व्यवसाय आणि व्यावसायिक

पवईत २६, २७ जानेवारीला भरणार रात्र बाजार

मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने मुंबईतील वरळी, मालाड आणि पवई येथे रात्र बाजार भरणार आहे. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये २६ आणि २७ जानेवारीला पवईमधील पवई तलाव भागात हा उत्सव रंगणार आहे. संध्याकाळी ४ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हा बाजार चालणार असून, मनोरंजन आणि खरेदी असे दुहेरी हेतू या रात्र बाजारातून […]

Continue Reading 0
raheja vista maids

रहेजा विहारच्या घरकाम करणाऱ्या महिलांचे कामबंद आंदोलन तात्पुरते मागे

चांदिवली, रहेजा विहार येथील रहेजा विस्टा सोसायटीने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी नवीन दरपत्रक काढत सरसकट सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याच्या घातलेल्या घाटाच्या विरोधात येथील घरकाम करणाऱ्या महिलांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ज्याबाबत काल मनसे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी दोन्ही पक्षांना समजावत आंदोलन पाठीमागे घेतले आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी योग्य मोबदला नाही दिला गेल्यास पुन्हा […]

Continue Reading 0

कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती; पवईकरांचा मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष

भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा करून पवईकर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे वस्त्रहरण करत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील ११ न्यायाधीशांच्या पिठाने अंतिम निर्णय येईपर्यंत कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली. या आनंददायी बातमीनंतर कुलभूषण यांच्या हिरानंदानी येथील घरासमोर जमा झालेल्या पवईकरांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून […]

Continue Reading 0

कथित गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्करी कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

भारतीय गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)चे गुप्तचर असल्याचा दावा करत, कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली रावळपिंडीच्या लष्करी कोर्टाने सोमवारी पवईकर आणि निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी ३ मार्चला बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलांने जाधव यांना अटक केली होती. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा निश्चित केल्याचे पाकिस्तानी […]

Continue Reading 0
nisha

तिनचाकीचे सारथ्य ‘ती’च्या हाती, संसाराचा गाडा हाकण्यासाठी

पवई, चांदिवली भागात तुम्ही रिक्षाला हात दाखवता, रिक्षा जवळ येवून थांबते आणि पाहता तर काय एक महिला रिक्षाचालक तिचे सारथ्य करत आहे. हो हे पवईच्या रस्त्यांवर शक्य आहे! कारण गेली अनेक वर्ष केवळ पुरुषांची मक्तेगिरी आहे असे समजले जाणाऱ्या रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात महिलाही उतरल्या आहेत. पार्कसाईट येथे राहणाऱ्या निशा अमोल दांगट (निशा शिवाजी शिंदे) गेली […]

Continue Reading 0
shivvada stall

पवईतील शिववडापावच्या गाड्या विनापरवाना

पवईत रस्त्यांवर ठिकठिकाणी शिववडाच्या नावावर स्टॉल व गाड्या लावून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांबद्दल महानगरपालिकेकडे पवईकराने माहितीच्या अधिकारानुसार केलेल्या अर्जातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवई भागात चालणाऱ्या कोणत्याही शिववडापाव गाडीस पालिकेतर्फे मंजुरी देण्यात आली नसून, राजरोसपणे बेकायदेशीररित्या चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. पवईत ठिकठिकाणी फुटपाथ व रस्त्यावर राजरोसपणे बेकायदेशीररित्या स्टॉल व गाड्या लावून […]

Continue Reading 0
मगरीच्या हल्ल्याचे शिकार: डावीकडून – बाबू भुरे यांचा फोटो दाखवताना परीवार सदस्य, मगरीच्या हल्यात आपले प्राण गमावलेला विजय भुरे व मगरीच्या हल्यात पायाचा चावा घेतल्याने पायाची चाळन होऊन गंभीर जखमी झालेला शंकर पवार.

मगरीच्या हल्ल्यानंतर स्थानिकांची सुरक्षा कुंपणाची मागणी

पवई तलावात मासेमारीसाठी जाणाऱ्या लोकांवर होणारे मगरीचे हल्ले वाढलेले आहेत. जे पाहता तिरंदाज व्हिलेज आणि स्थानिक परिसरातील लोक पोलीस आणि पालिका प्रशासन यांना सुरक्षा कुंपणाची मागणी करणारे पत्र देणार आहेत. पवई तलावातील ठराविक भागात सुरक्षा कुंपण टाकून स्थानिक मच्छीमारांसाठी ती जागा मासे पकडण्यासाठी सुरक्षित करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक आणि […]

Continue Reading 0
DSCN0221

पवई तलावात मगरीचा हल्ला, मच्छिमार गंभीर जखमी

पवई तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आयआयटी तिरंदाज व्हिलेजमध्ये राहणारे मच्छिमार बाबू भुरे (५०) यांच्यावर पद्मावती मंदिराजवळ मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच परिवारातील विजय भुरे याच्यावर ऑगस्ट २०१० मध्ये हल्ला करून मगरीने जीव घेतला होता. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचे साम्राज्य आहे. तशा सूचना देणारे फलकही पवई […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत खंडणीच्या गुन्ह्यात महिला पोलीस अधिकारी व दोन शिपायांना अटक

चांदिवली येथील ओसिएन स्पा आणि सलूनमध्ये देह्व्यवसाय चालतो असा खोटा आरोप लावून, धमकी देवून कारवाई टाळण्यासाठी स्पाच्या मालकिणीकडून २ लाख रुपयाची मागणी करून, १० हजार रुपयाची खंडणी उकळणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस निरीक्षकासह २ पोलीस शिपाई, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा (खबरी) व पोलीस असल्याचा दावा करणारी महिला (खबरी) अशा ५ जणांना पवई पोलिसांनी अटक […]

Continue Reading 0

पवईकरास पाकमध्ये हेरगिरीच्या संशयावरुन अटक

हिरानंदानी, पवई येथील रहिवाशी व व्यावसायिक असणारे कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या संशयात शुक्रवारी पाकिस्तानने बलुचिस्तानमधील चमन येथून अटक केली आहे. ते भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे अधिकारी असून, ते हेरगिरीसह बलुचिस्तानात फुटीरतावाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम करत असल्याचा आरोप पाकिस्तानने त्यांच्यावर ठेवला आहे. भारताच्यावतीने याबाबत स्पष्टीकरण देताना ‘ते नौदलाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांचा भारत सरकारशी सध्या […]

Continue Reading 0
asd

उंदीर स्टाईल ज्वेलरी शॉपची लूट

अनोळखी चोराने उंदराप्रमाणे भुयारी मार्ग खोदून, मध्यरात्री ज्वेलरी शॉपमध्ये घुसून, दुकानातील १.७ लाखाची चांदिचे दागिने लुटून घेवून गेल्याची अनोखी घटना साकिनाका पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दुकानाच्या जवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईन सोयीचा आधार घेत, चोरट्याने भुयारीमार्ग बनवून दुकानात प्रवेश करत ही चोरी केली आहे. याबाबत साकिनाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. […]

Continue Reading 0
fraud

हिरानंदानी समूहाला ४ कोटींची टोपी, कुंपणानेच खाल्ले शेत

नामांकित विकासक हिरानंदानी समूहाला त्यांच्याच एका कर्मचाऱ्याने प्रसिद्धीच्या नावावर कोट्यवधीं रुपयांना गंडा घातला आहे. समूहाने आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून २ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. आरोपी हा त्याच समूहात काम करत असताना, मित्राच्या मदतीने खोटी कंपनी स्थापन करून मोठी जाहिरात देण्याच्या नावावर ४ कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

Continue Reading 1
kidnapped

व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना अटक

सा किनाका येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून, त्यास बेदम चोप देऊन, लुटून पसार झालेल्या २ चोरट्यांना पकडण्यात बीकेसी पोलिसांना यश आले आहे. अपहरण आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. साकिनाका येथील कपडे व्यापारी राजकरन यादव यांचे अपहरण करून, त्यांना निर्जन स्थळी घेऊन जावून […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!