देशभर जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असतानाच पवईतील फुटपाथवरील एका बेवारस वडाच्या झाडाला महानगरपालिका ‘एस’ वॉर्ड उद्यान विभागातील उद्यान विद्या सहाय्यक अधिकारी अक्षया म्हात्रे आणि पवईतील नागरीकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. या वाचवलेल्या वडाच्या झाडाला आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात पुनर्रोपण करण्यात आले आहे. ‘पवई, आयआयटी येथील हरेकृष्ण रोडवर फुटपाथवर एक वडाचे झाड असून, […]
Archive | समाज प्रबोधन, समाजकार्य / समाजसेवा
जागतिक पर्यावरण दिनी पवई तलाव वाचवण्यासाठी मुंबईकर एकवटले
आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक मानाचे स्थान मिळवलेल्या पवई तलाव भागाचा पाठीमागील काही वर्षात उकिरडा आणि नाला झाला आहे. पवई परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी पवई तलावात सोडले जात असल्यामुळे त्याचा श्वास गुदमरून तो नष्ट होण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. त्यात भर म्हणूनच की काय आता या भागात खोदकाम आणि बांधकामानंतर निघणारा मलबा आणून […]
पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा
ग्रामीण भागात घरातून निघणारा कचरा, घाण, जनावरांच्या गोठ्यातून निघणारे मैल–मुत्र टाकण्यासाठी परिसरात मोकळ्या जागेत भलामोठ्या रुंदीचा खड्डा मारून त्यात ते टाकले जाते. ज्यास ग्रामीण भाषेत “उकीरंडा” असा शब्द वापरला जातो. पवईतील पवई तलाव भागाची सुद्धा पाठीमागील काही वर्षात अशीच अवस्था झाली आहे. परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी सध्या तलावात सोडले जात असून, त्याचा श्वास गुदमरू लागला […]
मेट्रो – ६ प्रकल्पावर एमएमआरडीएने विचारला मुंबईकरांचा सल्ला; सामाजिक कार्यकर्ते नाराज
बांधकामाला सुरुवात करून ६ महिन्यांनंतर लोकांचा सल्ला मागणे म्हणजे कागदपत्रांची पूर्ततेची औपचारिकता – सामाजिक कार्यकर्ते लोखंडवाला – विक्रोळी या भागात बनवण्यात येणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पाच्या कॉरिडोरच्या निर्मिती कामाच्या सुरू करण्याच्या जवळजवळ सहा महिन्यानंतर अखेर एमएमआरडीएने याबाबत नागरिकांचा सल्ला मागितला आहे. रविवारी एमएमआरडीएने पब्लिक नोटीस प्रसारित करून मेट्रो- ६ कॉरीडॉर, पर्यावरण आणि समाजावरील बांधकामांच्या प्रभावाबाबत […]
तुम्ही या लोकशाहीचे बादशहा आहात; माहिती अधिकार कायद्याचे ज्ञान आवश्यक
माहिती अधिकार अधिनियम कायदा हा सर्व सामान्य जनतेसाठी महत्वाचा नागरिकाभिमुख कायदा आहे. तुम्ही या लोकशाहीचे बादशहा आहात. पारदर्शकता, उत्तरदायित्व यासाठी या कायद्याच्या संकल्पना व कार्यपद्धतीबाबत कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवशक आहे. माहिती अधिकार अधिनियम कायदा हा सर्व सामान्य जनतेसाठी महत्वाचा नागरिकाभिमुख कायदा आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व यासाठी या कायद्याच्या संकल्पना व कार्यपद्धतीबाबत कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत […]
आज पवईत रंगणार आंबेडकरी कवी संमेलन
आज (५ मे २०१९) पवईत प्रथमच आंबेडकरी कवी संमेलन रंगणार आहे. भिमसेना पवई प्रतिष्ठाण आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जंयती निमित्त आयआयटी मार्केट परिसरात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हे आंबेडकरी कवी संमेलन होत आहे. वर्षा भिसे, रेशमा राणे, विलास बसवंत, प्रज्ञा रोकडे, भट्टू जगदेव, संगम पाईपलाईनवाला, वीणा भालेराव, विजय ढोकळे, साहेबराव […]
पवईत संत रविदास जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
@अवि हजारे संत शिरोमणी रविदास संघटनेतर्फे २५ फेब्रुवारी रोजी पवईच्या शिवकृपा इमारतीजवळील चौकात संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात महापुरुषांचे विचार आणि त्यांनी सांगितलेला मार्गावर विचारमंथन करण्यात आले. या प्रसंगी विचारमंचावर स्थानिक भाजप नगरसेविका वैशाली पाटील, अखिल भारतीय परिवार महाराष्ट्र महासचिव विरेंद्र धिवार, […]
पवईकरांची पुलवामा शहिदांना श्रद्धांजली; कॅण्डल मार्च, शोकसभा, निषेध, बंद
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत असून, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्था, संघटना, शाळा महाविद्यालयातर्फे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत दहशतवादी कृत्याचा निषेध करत आहेत. पवईमध्ये सुद्धा पवईकरांनी रस्त्यावर येत एकजुटीने कॅण्डल मार्च काढून, शोकसभा, निषेध नोंदवत आणि परिसरातील दुकाने […]
अपघात रोखण्यासाठी साकीनाका वाहतूक विभागाची रस्ता सुरक्षा जनजागृती
साकीनाका वाहतूक विभाग आणि डन अंड ब्राडस्ट्रीट इन्फोर्मेशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात रोखण्यासाठी ‘३० व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९’ अंतर्गत पवईच्या रस्त्यांवर जनजागृती उपक्रम राबवला गेला. यावेळी साकीनाका वाहतूक विभागाचे पोलीस उप-निरीक्षक जगदाळे आणि पोलीस उप-निरीक्षक भटकर यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन केले. राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. अपघातात […]
चांदिवलीत मिनी अग्निशमन केंद्र सज्ज
चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसरात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी चांदिवली येथे नुकतेच मिनी अग्निशमन केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार परिसरात गेल्या काही वर्षात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या असतानाच यासाठी अग्निशमन दल मरोळ किंवा विक्रोळी भागातून पाचारण करण्यात येते. लेकहोमच्या घटनेमुळे तर संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. अग्निशमन […]
गुन्हेगारी रोखण्यासाठी पवई पोलिसांची पायी गस्त; जनसंपर्क
गुन्हेगारी, गैरकृत्य रोखण्यासाठी पोलिसांचा अनोखा प्रयोग @प्रमोद चव्हाण मुंबईची कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षित ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांना आपण विविध वाहनातून गस्त घालताना पाहिले आहे. मात्र यामुळे गुन्हेगार कदाचित दूर राहतीलही पण जनतेशी असणारा जनसंपर्क बनेलच असे नाही. म्हनूणच पवई पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि पवईकरांशी आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी पायी गस्त घालण्याचा निर्णय घेत आयआयटी भागातून याचा […]
एमबीए फाऊंडेशनतर्फे “स्ट्राइड २०१८, वॉक विथ डिग्निटी”चे आयोजन
५ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या पवईतील एमबीए (म्यूचअली बेनिफिशिअल ऑफ अॅक्टिव्हिटीज) फाऊंडेशन संस्थेतर्फे “स्ट्राइड २०१८, वॉक विथ डिग्निटी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एमबीए सोबत २०११ पासून काम करणारी सेल्फ इस्टीम फाऊंडेशन या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख […]
“खिसेकापू, चोरांपासून सावधान” पवई पोलिसांची पोस्टर जनजागृती
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बसमधे, ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांची पाकिटे, मोबाईल, किंमती सामान लांबवणाऱ्या टोळ्या संपूर्ण मुंबईभर धुडगूस घालत आहेत. पवई, साकीनाका भागात गेल्या महिनाभरात अशा प्रकारच्या ७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि मुंबईकरांच्यात जनजागृतीसाठी पवई पोलीस ठाण्याच्यावतीने पवईतील गर्दीच्या आणि प्रमुख बस थांब्यांवर “खिसेकापू, मोबाईल चोरांपासून सावधान” असा इशारा देणारे […]
हरिओमनगरमध्ये मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाचा नारळ फुटला
पवईतील हरिओमनगर भागातून मुख्य वहिनीला जोडणाऱ्या मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाच्या मुहूर्ताचा नारळ आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते गुरुवारी (२५ ऑक्टोबर) फुटला. यावेळी स्थानिक नागरिकांसह शाखाप्रमुख (१२२) सचिन मदने, माजी शाखा प्रमुख निलेश साळुंखेसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत अजूनही काही परिसर असे आहेत जिथे लोकांना मूलभूत गरज मिळू शकलेल्या […]
तिरंदाज व्हिलेजमध्ये उभे राहिले पवईतील पहिले सुसज्ज सार्वजनिक शौचालय
पाठीमागील अनेक वर्षांपासून शौचालयाच्या समस्येने त्रस्त, मोठ्या हलाखीत जगणाऱ्या तिरंदाज व्हिलेज मधील रहिवाशांना आता दिलासा मिळाला आहे. खासदार फंडातून सोयी-सुविधांनी भरपूर असे एक सुसज्ज शौचालय येथे बांधण्यात आले आहे. यामुळे पवईतील सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या तिरंदाज व्हिलेज मधील रहिवाशांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आहे. मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे पवई. […]
पवईतील सावंत कुटूंबाची सामाजिक बांधिलकी, नेत्रदानातून कुटूंब प्रमुखाला मृत्यूनंतरही ठेवले जिवंत
@ रविराज शिंदे पवईतील महात्मा फूलेनगरमध्ये राहणारे सुनिल मनोहर सावंत (४५) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. परिवारावर कुटुंबप्रमुख हरवल्याने दुखाचा डोंगर कोसळला असतानाही धीर धरत सावंत कुंटुंबियांनी सुनिल यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. सुनिल सावंत पवईतील फूलेनगरमध्ये आपल्या पत्नी, दोन मुलं-मुलींसोबत राहत. रोजंदारीवर पेंटिंगचं काम करणाऱ्या सुनिल यांना मागील आठवड्यात आजाराने कवेत घेतले. त्यांच्यावर सायन […]
बंध रेशमाचे, बंधन रक्षणाचे
श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भारतीय संस्कृतीत बहिण आपल्या भावाला आपल्या बंधू प्रेमाचे प्रतिक आणि दीर्घायुष्यासाठी राखी बांधते, तर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पवईतील महिला आणि विद्यार्थिनीनी खऱ्या अर्थाने भावाचे कर्तव्य निभावणाऱ्या आणि केवळ आपल्याच नव्हे तर देशातील प्रत्येक बहिणींच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या वर्दीतील रक्षक पोलीस आणि सैनिक यांना राखी बांधत हा सण […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये रंगली पालकांची ‘फ्लॅग मेकिंग’ स्पर्धा
पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. त्यांना बघूनच मुले त्यांचे अनुकरण करत असतात, ही बाब लक्षात घेत पवई इंग्लिश हायस्कूलतर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत फ्लॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी वायुसेना अधिकारी दिनेश नायर आणि महिला उद्योजिका सुनिता विनोद यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्वातंत्र्य दिवस म्हटले की प्रत्येक शाळेत रंगतात त्या म्हणजे […]
रहेजाकराची वृद्धेला मदत; मिळवून दिला आसरा
मुंबईच्या रस्त्यावरून चालताना एसी गाडीत बसून प्रशासन आणि पब्लिकला शिव्या घालणारे भरपूर मुंबईकर मिळतील; पण रस्त्यावर उतरून वैयक्तिक सामाजिक जबाबदारी (पर्सनल सोशल रीस्पोन्सिबीलीटी) पाळणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. चांदिवली येथील रहेजा विहार येथे राहणारे राजेश राजपूत हे त्यापैकीच एक. आपली ही जबाबदारी निभावताना एका वृद्ध महिलेला त्यांनी रस्त्यावर खितपत पडू न देता आसरा मिळवून दिला […]
पवईत महिलांसाठी मोफत नर्सिंग, ब्युटीपार्लर कोर्स डेमोचे आयोजन
आजच्या महिलांनी स्पर्धेच्या युगात स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे; हेच लक्षात घेऊन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, पवई यांच्यातर्फे महिला तसेच युवतींसाठी रविवारी मोफत नर्सिंग तसेच ब्युटीपार्लर कोर्स डेमो लेक्चरचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून, इच्छुक महिला तसेच युवतींना दिलेल्या लिंकवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करता येणार आहे. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, पवईचे […]