मिलिंदनगर येथे एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत धमकावून त्याच्या घरांपैकी एक घर किंवा २ लाख रुपये खंडणी मागितल्याबद्दल गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार अमीन मोमीन खान (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक कांबळे हे मिलिंदनगर येथे राहतात. २७ नोव्हेंबर रोजी ते आपल्या परिसरात असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास अमीन खान […]
Archive | Crime
५० वर्षीय लॅपटॉप चोराला अटक
हिरानंदानी भागातून लॅपटॉप चोरी करून पसार झालेल्या ५० वर्षीय चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उमेश रतिलाल परमार असे अटक आरोपींचे नाव असून, तो कार चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा लॅपटॉप हस्तगत केला आहे. भारतीय शसस्त्र सेनेत कॅप्टन म्हणून कार्यरत असणारे फिर्यादी अमित राय हे आपल्या एका मित्रासोबत हिरानंदानी येथील पवई सोशलमध्ये जेवणासाठी […]
दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक, ९ मोटारसायकली जप्त
पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४.५५ लाख रुपये किंमतीच्या नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यातील एक मोटारसायकल या चोरट्यांनी पवई परिसरातून चोरी केली आहे. जितेश सुरेश काळुखे (२५) आणि अरुण मतांग (२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, दोघेही घाटकोपरचे रहिवासी असून, पार्ट-टाईम केटरिंगचे काम करतात. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ […]
रहेजा विहारमध्ये वकिलाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
रहेजा विहार येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय वकिलांनी इमारतीच्या २० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक दाजी जाधव असे आत्महत्या करणाऱ्या या व्यक्तीचे नाव असून, स्मृतीभृंश झाला असल्याने त्यांनी हे पाउल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेजा विहार येथील सिल्वर क्रेस्ट इमारतीत राहणारे जाधव हे व्यवसायाने वकील होते. कोरोना […]
मुंबईतील रिक्षा चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; ४ जणांना अटक
मुंबईतील विविध भागात रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीच्या ४ सदस्यांना आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा चोरून संबंधित रिक्षाची नंबर प्लेट बदलून काही रिक्षा चालकांना तीनशे रुपये प्रमाणे भाड्याने चालवायला देत तर काही रिक्षा नाममात्र किंमतीला विकत. पोलिसांनी नालासोपारा, अंधेरी, गोरेगाव परिसरातून ६ […]
ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; जम्मू काश्मीरहून मुंबईत आणलेला १४ कोटींचा चरस जप्त, ४ जणांना अटक
मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई करत ड्रग्स तस्कर महिलेला अटक करत तिच्याकडून तब्बल ७ किलो हिरोइन जप्त केले असतानाच आता जम्मू काश्मीरशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत पवई आणि अंधेरी स्थित २ जोडप्यांकडून २४ किलो चरस जप्त केले आहे. पकडलेल्या २४ किलो चरसची […]
बोगदा खोदून ५ स्टार हॉटेलमधून पळवला ७ लाखाचा रोमन योद्ध्याचा पुतळा
प्रातिनिधिक छायाचित्र एका पंचतारांकित हॉटेलच्या भिंतीखाली बोगदा खोदून रोमन योद्ध्याचा पितळी पुतळा चोरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अलीकडेच अटक केली आहे. रोमन योद्ध्याच्या या ३०० किलोच्या पुतळ्याची किंमत ७ लाख रुपये आहे. चोरट्यांनी जंगलात लपवून ठेवलेले पुतळ्याचे तुकडे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहेत. रॉयल पाम्सच्या आत असलेल्या इम्पिरियल पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये चोरी झाल्याची तक्रार १२ […]
मोटारसायकल चोरट्याने अर्ध्या तासात उलगडली गाडी; तासाभरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई पोलीस ठाणे हद्दीपासून काहीच अंतरावर पार्क केलेली मोटारसायकल पळवून नेऊन अर्ध्या तासात त्याचे पार्ट काढून विकण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहीम अकबर शेख उर्फ झिपी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मोहमद गणी शेख हे कुर्ला कोर्टाजवळ राहतात. १८ तारखेला त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते […]
अट्टल रिक्षा चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवईसह मुंबई परिसरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. शांताराम अशोक धोत्रे (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धोत्रे याच्या विरोधात मुंबईत अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असून, १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आला होता. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज पंडित हे भाडेतत्वावर रिक्षा चालवतात. त्यांच्या ताब्यातील चालवण्यासाठी […]
मोटारसायकल चोराला अटक; बाईक हस्तगत
पवई परिसरात आपल्या आईला भेटायला आलेला व्यक्तीची मोटारसायकल चोरी करून घेवून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणाला शुक्रवारी पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. करण विनकरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. भांडूप येथे राहणारे फिर्यादी देवेंद्र पोतदार हे १२ ऑक्टोंबरला पवईत त्यांच्या आईला भेटण्यासाठी आले होते. पदमावती रोडवर […]
पवई पोलिसांनी मोटार सायकल चोराला ठोकल्या बेड्या
पवई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. संकेत रामचंद्र गोरे (वय २० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून, मुंबईत अजून कोठे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. फिर्यादी नामे अतिन […]
विमानाने प्रवास करून २८० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या तिकडीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर […]
पवईत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या छापेमारीत ड्रग्जसह एकाला अटक
मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी (५ ऑक्टोबरला) रात्री पवई परिसरात छापा टाकत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. अंचित कुमार असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडून ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. शनिवार, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या एका क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. क्रुझवर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने रविवारी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा […]
मांजरीच्या पिल्लांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
सोसायटीच्या आवारात काळजी घेत असलेल्या दोन आठवड्यांच्या २ मांजरांच्या पिल्लांना बेकायदेशीररित्या बाहेर निर्जनस्थळी सोडल्याबद्दल पवई स्थित, प्राणीप्रेमी नेहा शर्मा यांनी त्यांच्या सोसायटीचा सफाई कर्मचारी रामचंद्र याच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार शर्मा या एक मांजर आणि त्याच्या दोन पिल्लांचे पवईतील लेकहोम कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या आवारात काळजी घेत होत्या. “४ सप्टेंबर रोजी, मी […]
साकीनाका परिसरात ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार; मारहाण
साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७, ३७६, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहितीही समोर येत आहे. पीडित महिलेची परिस्थिती […]
डंपर चोरी करणाऱ्या आरोपीस पवई पोलिसांनी अवघ्या पाच तासात ठोकल्या बेड्या
पवई, साकीनाका भागातून डंपर चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या ५ तासात माग काढत अटक केली आहे. पप्पु उर्फ बहादुर राममनी आदिवाशी (वय ३० वर्षे) राहणार उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० लाख किंमतीचा डंपर हस्तगत केला आहे. फिर्यादी मोहम्मद बिलाल छांगुर चौधरी यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी […]
बाईक स्टंट करणाऱ्या सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सरला पवई पोलिसांचा दणका; परवाना निलंबित, बाईक जप्त
पवई पोलिसांनी जप्त केलेली अरमान खान याची मोटारसायकल बाईकवरून स्टंट करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या एका २१ वर्षीय सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सर तरुणाला पवई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची विनापरवाना मोडीफाईड मोटारसायकल जप्त केली आहे. एवढ्यावरतीच न थांबता त्याचा मोटारसायकल चालवण्याच्या परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुन्हा असे कृत्य […]
महिला कमांडोनी आवळल्या लॅपटॉप चोरांच्या मुसक्या
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिलांनी त्या कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. असेच दोन महिलांचे धाडसी काम बुधवारी पवईतील हिरानंदानी भागात पाहायला मिळाले. येथे गस्तीवर असणाऱ्या महिला कमांडोनी संपूर्ण मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या लॅपटॉप चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रमजान मोहमद सय्यद (२६) आणि विशाल भरत काळे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही […]
पवई तलाव डॅमवर भिजायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
पवई तलाव डॅम भागात शुक्रवारी एक १३ वर्षीय मुलाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. २ दिवसांपासून बेपत्ता असणारा हा मुलगा आपल्या काही मित्रांसोबत येथे फिरण्यासाठी आला होता. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीमरी येथे राहणारा वैष रईस खान हा आपल्या काही मित्रांसोबत पवई तलाव भागात फिरण्यासाठी आला होता. डॅमवर आल्यावर त्यांना भिजण्याचा मोह आवरला नाही […]
चांदीवलीत डिलिव्हरी बॉयला कचऱ्याच्या डंपरने चिरडले
चांदीवली येथील लेकहोम जवळ एका डिलिव्हरी बॉयला डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. डिलिव्हरी बॉय सकाळी कामावर हजर होत असताना मोटारसायकल घसरल्याने डंपरखाली आल्याने ही घटना घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत डंपर चालक मोहम्मद आरिफ मोहंम्मद याकूब शहा (३४) याला अटक केली आहे. चांदीवली येथील संघर्षनगर भागात राहणारे आणि डिलिव्हरी बॉय म्हणून […]