रहेजा विहारमध्ये वकिलाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

रहेजा विहार येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय वकिलांनी इमारतीच्या २० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक दाजी जाधव असे आत्महत्या करणाऱ्या या व्यक्तीचे नाव असून, स्मृतीभृंश झाला असल्याने त्यांनी हे पाउल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेजा विहार येथील सिल्वर क्रेस्ट इमारतीत राहणारे जाधव हे व्यवसायाने वकील होते. कोरोना काळात सर्वच व्यवसाय डबघाईला आले. याच काळात जाधव यांनाही काम मिळणे कमी झाले होते. त्यातच त्यांना काही आजार सुद्धा जडले होते. काही महिन्यांपासून त्यांचा स्मृतीभृंश झाला होता.

सोमवारी सकाळी भावाकडे जातो असे सांगून ते घराबाहेर पडले. इंटरकॉमवर फोन करून एक व्यक्ती रहेजा विस्टा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पडल्याची माहिती देण्यात आली. मी तिथे जावून पाहिले असता ते माझे वडील होते. असे याबाबत जाधव यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

“जाधव हे घरातून बाहेर निघाल्यावर त्यांच्या इमारतीच्या समोरच असणाऱ्या रहेजा विस्टा इमारतीच्या २०व्या मजल्यावर ते गेले आणि तेथून त्यांनी उडी मारली. ८ मजल्यावर कट्यावर आदळून त्यांच्या खिशातील फोनसह इतर सामान तिथेच पडले आणि ते सरळ ३ मजल्यावर येवून पडले. या सर्वात ते गंभीर जखमी झाले, असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “त्यांच्या मुलाने त्यांनी आजारपण आणि काम गेल्याने हे पाउल उचलले असल्याच्या दिलेल्या जवाबावरून आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

, , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: