मोटारसायकल चोरट्याने अर्ध्या तासात उलगडली गाडी; तासाभरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई पोलीस ठाणे हद्दीपासून काहीच अंतरावर पार्क केलेली मोटारसायकल पळवून नेऊन अर्ध्या तासात त्याचे पार्ट काढून विकण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहीम अकबर शेख उर्फ झिपी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी मोहमद गणी शेख हे कुर्ला कोर्टाजवळ राहतात. १८ तारखेला त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते वहिनीला भेटायला डीओ मोटारसायकलवरून चांदिवली येथील मन्नुभाई चाळ येथे आले होते. संध्याकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लुंबिनी बुद्धविहारजवळ त्यांनी आपली मोटारसायकल एमएच ०३ सीआर ३१८७ पार्क करून ठेवली होती.

“९.४५ वाजण्याच्या सुमारास मी परत जाण्यासाठी बाहेर आलो असता गाडी पार्क केलेल्या ठिकाणी नव्हती. आसपास शोध घेतल्यावर सुद्धा ती मिळून आली नाही.” असे पोलिसांना दिलेल्या जवाबात फिर्यादी यांनी म्हटले आहे.

शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला होता.

“परिसरात असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण ती मोटारसायकल घेवून जाताना आढळून आला. फुटेज आणि गुप्तबातमीदार यांच्या माहितीच्या आधारे आम्ही तासाभरातच इब्राहीमला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील यांनी सांगितले.

“प्रथमता चोरीस गेलेल्या गाडीचा फक्त सांगाडाच आमच्या हाती आला होता. चोरट्याने चोरीच्या अर्ध्या तासातच गाडीचे सगळे भाग सुट्टे करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. हे भाग विकून तो पैसे मिळवण्याच्या तयारीत असतानाचा पोलिसांनी त्याला अटक केली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!