प्रामाणिक लोक या जगात अजूनही शिल्लक आहेत याचे एक उत्तम उदाहरण आज पहाटे पवईत पहायला मिळाले. कर्तव्य आणि प्रामाणिकपणा याची योग्य सांगड घालत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या अंकित गंभीर या तरुणाने रस्त्यात पडलेला महागडा फोन त्याच्या मालकाला परत केला आहे. आपले कर्तव्य तर पूर्ण करतानाच त्याने आपला प्रामाणिकपणा जपल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. […]



















