पोलीस शववाहिनीतून चोरीचे भंगार घेवून जाणाऱ्याला अटक

मुंबई पोलिसांच्या शववाहिनीतून चोरीचे भंगार घेवून जाणाऱ्या एकाला पवई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मनोज वाल्मिकी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, पोलीस शववाहिनीवर तो सहाय्यक म्हणून काम करतो. पवई पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले भंगार जप्त केले आहे. मात्र पोलिसांच्या गाडीतून चोरीचे भंगार घेवून जात असल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर बेवारस अवस्थेत सापडलेले मृतदेह मुंबई पोलिसांतर्फे रुग्णालयात घेवून जाण्यासाठी, रुग्णालयातील पोलीस शवविच्छेदन केंद्रातील बेवारस मृतदेह अंत्यविधी नेण्यासाठी मुंबई पोलिसांना विशेष शववाहिनी देण्यात आली आहे. पवई आणि आसपासच्या परिसरात वापरात येणारी ही शववाहिनी मरोळ येथील पोलीस केंद्रात उभी केली जाते.

“या शववाहिनीवर सहाय्यक म्हणून काम करणारा मनोज हा शनिवारी आपल्या वेळेनुसार सकाळी कामावर हजर झाला होता. कचरा काढण्याच्या बहाण्याने याच परिसरात काम सुरु असणाऱ्या एका इमारतीत घुसून त्याने येथून भंगार चोरी करून शववाहिनीत ठेवत असल्याचे एका कामगाराने पाहिले,” असे पोलिसांनी सांगितले.

कामगाराने याबाबत इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला सांगितले असता सुरक्षा रक्षकाने याबाबत त्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पवार यांना याबाबत माहिती दिली.

पवार यांनी मनोज याच्याकडे केलेल्या चौकशीत सुरुवातीला त्याने याला नाकारले मात्र शववाहिनीतून एका पिशवीत भंगार मिळून आल्यानंतर मनोजने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

सुरक्षा रक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पवई पोलिसांनी मनोज याला अटक केली आहे. “मनोजने या आधीही असे काही कृत्य केले आहे का ? किंवा पोलीस शववाहिनीच्या आडाने त्याने आणखी काही गुन्हा केला आहे का ? याचा पवई पोलीस तपास करत आहेत.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!