पावसाळ्याचे दिवस असूनही मुंबईतील पवई आणि चांदिवली या दोन शेजारील परिसरात सध्या पाण्याची प्रचंड चणचण जाणवत आहे. एका बाजूला झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गरीब नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला बहुमजली सोसायट्यांमधील रहिवाशांना खाजगी टँकरसाठी दररोज हजारो रुपयांचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या दोन्ही भागांतील पाणीबाणीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात […]

















