Archive | Cyber Crime

mobile cyber crime

सायबर फसवणुकीत ऑटोरिक्षा चालकाला १.४ लाखाचा फटका

पवई पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या एका ऑटोरिक्षा चालकाची डिजिटल वॉलेटवर आधारित पेमेंट अ‍ॅप्लिकेशन सेटअप करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने १.४ लाखाची फसवणूक केली आहे. अज्ञात आरोपीने त्या अ‍ॅप्लिकेशन कंपनीचा प्रतिनिधी असून, अ‍ॅप सेटअप आणि बँकेची नोंदणी करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने ऑटोरिक्षा चालकाला फसविले. यासंदर्भात पवई पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित […]

Continue Reading 0
online cheating

झटपट कमाईचा ऑनलाईन फंडा, मनोरंजन कंपनीत काम करणाऱ्याला १.६ लाखाचा गंडा

एका अज्ञात सायबर भामट्याने मनोरंजन कंपनीत काम करणाऱ्याला पवईतील २५ वर्षीय व्यक्तीची १.६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. तक्रारदाराने वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवलेल्या रेफ्रिजरेटर आणि फुट मसाजर मशीन खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने ही फसवणूक केली आहे. सायबर चोरट्याने त्या वस्तू खरेदीसाठी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला आणि देय स्वीकारण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. […]

Continue Reading 0
online cheating

केवायसी फसवणूकीत आयआयटीच्या विद्यार्थिनीने गमावले ८६ हजार

पवईस्थित आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी केवायसी फसवणूकीची नवीनतम बळी ठरली आहे. सायबर चोरट्याने केवायसीच्या नावाखाली तिच्या खात्यातून ८६ हजार रुपये उडवले आहेत. यासंदर्भात पवई पोलीस ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. तक्रारदार तरुणी ही पवईतील आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेत आहे. २४ एप्रिलला ती आपल्या कॅम्पसमध्ये असताना तिच्या मोबाईलवर एका […]

Continue Reading 0
online cheating

अभिनेत्याची ८६ हजाराची ऑनलाईन फसवणूक

३३ वर्षीय मालिका अभिनेता नुकताच नवीन ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला आहे. कर्जाची रक्कम सेटलमेंटच्या नावाखाली सायबर चोरट्याने त्याची ८६ हजाराची फसवणूक केली. ई-वॉलेटच्या माध्यमातून शिल्लक कर्जाची माहिती मिळवत सायबर चोरट्याने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पैसे हस्तांतरित झालेल्या बँकेच्या मालाड येथील शाखेतील खाते गोठवत अधिक तपास करत आहेत. या संदर्भात […]

Continue Reading 0
online cheating

चार्टर्ड अकाऊंटंटला ४८ हजाराला गंडा

पवईतील एका चार्टर्ड अकाऊंटंटला त्याच्या घरातील वाय-फाय ब्रॉडबँड सेवेसाठी ऑनलाईन केवायसी करण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने ४८ हजार रुपयाला गंडा घातला आहे. सायबर चोरट्याने एक अॅप डाउनलोड करण्यास सांगत तक्रारदार यांच्या फोनचा रिमोट एक्सेस मिळवून प्रत्येकी २४ हजाराच्या दोन व्यवहाराद्वारे पैसे ट्रान्सफर केले. ७ एप्रिल रोजी तक्रारदार यांनी आपल्या घरात ब्रॉडबँड सेवा सुरु केली होती. […]

Continue Reading 0
phishing

एज्युकेशन लोनच्या नावाखाली आयटी प्रोफेशनलला एक लाखाचा गंडा

पवईकर आणि आयटी प्रोफेशनल असणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी १.१ लाख रुपयांना ऑनलाईन फसवले आहे. सदर महिला एमबीएमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती शोधत होती. कर्ज घेण्यासाठी आर्थिक संस्थेचा शोध घेत असताना या महिलेने इंटरनेटवर सापडलेल्या नंबरवर संपर्क साधला, परंतु ती तिच्या बचतीतून १.१ लाख रुपये गमावून बसली. या संदर्भात […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

मित्रांसोबत पार्टी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्याने केली फसवणूक; पुण्यातून अटक

पवईकराच्या लोणावळ्यातील एका व्हिलाच्या छायाचित्रांचा वापर करून बनावट जाहिरात आणि आयडी तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला पवई पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. बांद्रा येथे निर्माण करण्यात आलेल्या सायबर युनिटच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आकाश जाधवानी असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. व्हिला बुकिंगसाठी मोठी सूट देत डझनभरापेक्षा जास्त पर्यटकांना […]

Continue Reading 0
Now-cyber-cells-at-every-police-stations-of-Mumbai-1

ज्येष्ठ नागरिकाचे ई-फ्रॉडने पळवलेले ७४.५ हजार रुपये पोलिसांनी काही तासात दिले परत मिळवून

ऑनलाईन फसवणूकीत एका ज्येष्ठ नागरिकाने गमावलेले ७४,५०० रुपये काही तासातच साकीनाका पोलिसांनी कारवाई करत परत मिळवून दिले आहेत. घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट ब्रोकरच्या माध्यमातून कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून, लष्करात अधिकारी असल्याचे सांगत महिलेने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली होती. पोलिसांच्या या कारवाईची प्रशंसा करताना ज्येष्ठ नागरिक यांनी मुंबई पोलिस दलाची स्कॉटलंड यार्डशी तुलना केली आहे. […]

Continue Reading 0
online cheating

ऑनलाईन हॉलिडे व्हिला बुकिंगच्या नावावर फसवणूक

येणाऱ्या सुट्टीत तुम्ही ऑनलाईन व्हिला किंवा घर बुक करून हॉलिडेसाठी जाण्याची योजना करीत असाल तर सावधान ! आपण व्हिलाचे मालक असल्याचे भासवत सायबर फसवणूक करणार्‍यांना फसवण्यासाठी नवीन मार्ग सापडला आहे. ट्रॅव्हल वेबसाइटवर दुसऱ्याच्या व्हीलाचे फोटो वापरुन बनावट खाती तयार करून लोकांकडून ऑनलाइन हॉलिडे व्हिला बुकिंगच्या नावावर अ‍ॅडव्हान्स पैसे उकळून ग्राहकांची आणि मालकांची फसवणूक करणारी टोळी […]

Continue Reading 0
online cheating

विमान कंपनीच्या फेक तिकीट बुकिंग साईटवरून पवईकराला ३.५ लाखाचा गंडा

एका नामांकित विमान कंपनीच्या खोट्या वेबसाईटला भेट दिल्याने ७५ वर्षीय पवईकराला आपले ३.५ लाख गमवावे लागले आहेत. आपल्या व पत्नीच्या वाराणसी येथील प्रवासाच्या बदलासाठी (पुढे ढकलण्यासाठी) ज्येष्ठ नागरिकाने या वेबसाईटला भेट दिली होती. आपल्या बचत खात्यातून एवढी मोठी रक्कम आपला फोन हॅक करून पळवल्याबाबत तक्रार या ज्येष्ठ नागरिकाने पवई पोलीस ठाण्यात केली आहे. कोरोना महामारीमुळे […]

Continue Reading 0
online-scam

प्रेमात ११ लाखाला गंडवले

पवई येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय व्यक्तीला सोशल मीडियावर मैत्रीण असलेल्या महिलेने मदतीच्या नावाखाली ११ लाखाला गंडवले. विशेष म्हणजे त्याने युनाइटेड किंगडममध्ये (युके) असल्याचा दावा करणार्‍या आपल्या या मैत्रिणीला मदत करण्यासाठी आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतले आहे. २९ वर्षीय व्यक्ती मुंबई विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत होता. परंतु कोरोनाव्हायरस आजारामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये तो नोकरी […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

राजस्थानच्या जंगलातून सायबर चोरांना अटक; साकीनाका पोलिसांची कारवाई

चांदिवली परिसरातील दोघांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याला साकीनाका पोलिसांनी राजस्थानातील जंगलातून अटक केली आहे. चांदिवली येथील एका महिलेची वाईन शॉपच्या नावे ऑनलाईन पेमेंटच्या साहाय्याने तर २२ वर्षीय तरुणाची जून महिन्यात लष्करी अधिकारी असल्याचे सांगून, मोटारसायकल विकण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती. दोन्ही घटनांमध्ये साकीनाका पोलिसांनी मागवलेल्या कॉल डिटेल्सच्या तपासात एक सामान्य दुवा त्यांना मिळून आला […]

Continue Reading 0
online cheating

ईमेल खाते हॅक करून २ जणांना १.७ लाखाचा गंडा

७२ वर्षीय पवईकराचा इमेल हॅक करून ‘सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अडकला आहे’ असे त्याच्या यादीतील लोकांना सांगून १.७ लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. संकटात अडकलेल्या आपल्या मित्राला मदत करण्याच्या प्रयत्नात दोन लोकांची यात फसवणूक झाली आहे. मरोळ येथील एका खासगी कंपनीत नोकरी करणारे सुधाकर पटनायक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

लष्करात अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पवई पोलिसांनी केली अटक

पवई पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि तोतयागिरीच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. करण शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पवई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत तिला लग्नाची बनावट आश्वासने देवून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले […]

Continue Reading 0
online cheating

७०० रुपये वाचविण्याच्या नादात सायबर फ्रॉडस्टरचा महिलेला ६२ हजाराचा गंडा

ऑनलाईन मद्य खरेदी करून घरपोच पोहचण्याची नवीन सोय या लॉकडाऊनकाळात सुरु झाल्यामुळे मध्यप्रेमींची चांगलीच सोय झाली असतानाच, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी या परिस्थितीचा फायदा उठविला आहे. दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, मुंबईतील पवई भागातील बहुमजली इमारतीत राहणारी ३८ वर्षीय महिला, जी एका खासगी कंपनीत वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम करत आहे, ती सायबर फसवणुकीची […]

Continue Reading 0
online cheating

ऑनलाईन मोटारसायकल खरेदी करणे तरुणाला पडले महागात; गमावली तिप्पट रक्कम

सेकंडहॅन्ड मोटारसायकल ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या २५ वर्षीय तरुणाला ऑनलाईन फसवणूकीत ७२,००० रुपयांची टोपी लागली आहे. २५,००० रुपये किंमतीच्या त्या मोटारसायकल खरेदीत रस असणाऱ्या तरुणाला त्याच्या जवळपास तिप्पट रक्कम गमवावी लागली आहे. यासंदर्भात साकीनाका पोलिस भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत या प्रकरणाची चौकशी करत […]

Continue Reading 0
online cheating

हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख

अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]

Continue Reading 0

मेडिकल स्टोअर मालकाची ऑनलाईन फसवणूक

पवई येथील मेडिकल आणि जनरल स्टोअरच्या मालकाची ₹ २०,०००ची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी आपली ओळख सैन्य अधिकारी म्हणून करून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात नागरिकांना आवश्यकता असणाऱ्या मेडिकल किटची गरज लक्षात घेता, आरोपीने हँड सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्हज ऑर्डर करून त्याचे पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड पाठवत मेडिकल मालकाची ऑनलाईन […]

Continue Reading 0

ऑनलाईन दारु मागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला ८२ हजारांची टोपी

‘अनलॉक १’ मध्ये काही दुकाने आणि व्यवसाय चालू झाली असली तरीही काही दुकानांना उघडण्यास अद्याप  बंदी करण्यात आली आहे. या काळात एका बँक कर्मचाऱ्याला ऑनलाईन दारु मागवणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स दिल्यामुळे खात्यातून चोरट्यांनी ८२ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबवत त्याला टोपी घातली आहे. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच दारु ऑनलाईन विक्रीला […]

Continue Reading 1

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!