जन्माच्या ३ तासातच बाळाला उच्च तापाची लक्षणे दिसल्याने केलेल्या तपासणीत बाळाचा अहवाल आला होता कोरोना पॉझिटिव्ह. एका १८ दिवसांच्या बाळाने (baby) कोरोना व्हायरसचा (coronavirus) पराभव (defeats) करत कोरोनामुक्त झाल्याची आनंददायी आणि आशादायी बातमी समोर येत आहे. गुरुवारी पवईतील हिरानंदानी रुग्णालयातून बाळाला घरी सोडण्यात आले आहे. सर्वात कमी वयात कोरोना व्हायरसचा पराभव करत घरी परतणारे ते […]
Archive | Corona / Covid 19
पवईत तीन दिवसात २८ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
पवई (Powai) परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह बाधितांचा आकडा २७० वर पोहचला असून, पाठीमागील तीन दिवसात यात २८ बाधितांची भर पडली आहे. यात मंगळवार २६ मे रोजी ३, बुधवार २७ मे रोजी ९ तर गुरुवार २८ मे रोजी १६ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळून आले आहेत. एका बाजूला पवईतील बाधितांचा कोरोनामुक्त होत रिकवरी रेट वाढत असतानाच मोठ्या […]
‘कोरोनाला घाबरू नका, आपली प्रतिकारशक्ती वाढवा’; वाचा कोरोनामुक्त झालेल्यांचे अनुभव
पवईत कोरोना बाधितांच्या आकडा वाढत असतानाच ४२% लोक कोरोनामुक्त होऊन आता घरी परतले आहेत. कोरोनाला घाबरू नका, आपली प्रतिकारशक्ती वाढवा. काळजी घ्या, तुम्ही लवकरच बरे होणार आहात! आपले प्रशासन मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे, त्यांना गरज आहे ते आपल्या सहकार्याची, असे सांगणे आहे कोरोना मुक्त झालेल्या पवईकरांचे. आपला कोरोना पॉझिटिव्ह ते कोरोनामुक्त पर्यंतचा प्रवास […]
फुलेनगर कोरोना मुक्तीच्या दिशेने, ८५% बाधित बरे होऊन घरी परतले
पवईसह मुंबईत कोरोना बाधितांचा ‘रेड झोन’ म्हणून ओळखले जाणारे पवईतील आयआयटी मार्केटजवळ असणारा महात्मा ज्योतिबा फुलेनगर परिसर आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्वी मिळालेल्या बाधितांपैकी ८५% बाधित कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. पवईच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची नोंद होत असतानाच, पाठीमागील १० दिवसात फक्त ५ बाधितांची नोंद आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर […]
पवईत आज ६ कोरोना बाधितांची नोंद
पवईतील कोरोना बाधितांच्या संख्येने २०० बाधितांचा टप्पा पार केला आहे. सोमवार, २५ मे रोजी यात ६ बाधितांची वाढ झाली आहे. सोमवारी मिळालेल्या बाधितांमध्ये एकाच कुटुंबातील दोघे तर अगोदर मिळून आलेल्या बाधिताच्या परिवारातील व्यक्तीचा समावेश आहे. पालिकेतर्फे हे संपूर्ण परिवार सिल करण्यात आले असून, नागरिकांना सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई भोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस […]
न्यूज अपडेट: गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण
न्यूज अपडेट: रविवार २४ मे, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ते पोलीस खात्यात कार्यरत आहेत. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
न्यूज अपडेट: शनिवारी आयआयटी पवई समोरील भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
पवईत आत्तापर्यंत १७८ कोरोना बाधितांची नोंद; रिकव्हरी रेट ३८%
पवई परिसरात कोरोना बाधितांचा आकडा हा वाढत चालला असून, २१ मे पर्यंत पवई परिसरात १७८ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात ६६ महिला तर ११२ पुरुषांचा समावेश आहे. या आकड्यात सर्वात कमी मार्च महिन्यात तर सर्वात जास्त ही मे महिन्यात कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यात रिकव्हरी रेट हा ३८% वर […]
पवईत आजपर्यंत ९४ कोरोना पॉझिटिव्ह; आयआयटी फुलेनगर हॉटस्पॉट
बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि मुंबई पोलीस यांच्याकडे नोंदवण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पवईतील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सोमवार, ११ मे पर्यंत ९४ वर पोहचला आहे. बरेच दिवस चाळसदृश्य लोकवस्तीत मर्यादित राहिलेल्या कोरोना विषाणूमुळे पवईतील इमारत भागात राहणारे रहिवाशी सुद्धा बाधित झाल्याचे आता समोर येत आहे. आयआयटी मार्केटजवळ असणारा फुलेनगर कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट झाला आहे. सोमवार अखेरपर्यंत […]
पवईत आतापर्यंत ६५ जणांना कोरोनाची लागण; एकाच दिवसात ९ बाधितांची वाढ
पवईत कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवार ७ मे पर्यंत पवईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे बुधवारी एका दिवसात यात ९ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. पाठीमागील काही दिवस केवळ चाळ सदृश्य लोकवस्तीतच कोरोना बाधित मिळत होते, मात्र आता इमारतीमध्ये सुद्धा कोरोना बाधित मिळून येत आहेत. पवई विहार, […]