The 74th Republic Day celebrations of independent India were celebrated with pomp and fanfare at various places in Powai and Chandivali. Powai English High School (PEHS) also celebrated “Azadi ka Amrut Mahotsava” on Republic Day with great enthusiasm. On this occasion, the flag was unfurled by Veteran, Commander Vijay Vadhera. The attraction of this National […]
Archive | news
प्रजासत्ताक दिनानिमित्त पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘कलादर्पण’चे आयोजन
स्वतंत्र भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन सोहळा पवई, चांदिवलीमध्ये विविध ठिकाणी धूमधडाक्यात साजरा झाला. पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये देखील मोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन पार पडला. यावेळी माजी सैनिक कमांडर विजय वडेरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पवई इंग्लिश हायस्कूलच्या या राष्ट्रीय उत्सवाचे आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आणि विविध आकर्षक कार्यक्रमांनी रंगलेले ‘कलादर्पण’ […]
पवई, चांदिवलीत ३ ठिकाणी ‘आपला दवाखाना’; मोफत उपचार
मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजेच एचबीटी क्लिनिकच्या संख्येने शंभरी ओलांडली असतानाच यातील ३ दवाखाने हे पवई आणि चांदिवली परिसरात आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर किमान १०० ‘आपला दवाखाना’ सुरु होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आपला दवाखान्यांची एकूण संख्या १०६ इतकी झाली असल्याची घोषणा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. […]
मुंबई पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांना ‘आयएमसी पुरस्कार’
मुंबई पोलीस दलात प्रशाकीय कामात केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांचा मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या ‘आयएमसी पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला आहे. मुंबई पोलीस कर्मचार्यांना उत्कृष्ट सार्वजनिक सेवा २०१९-२०२२साठी आयएमसी शताब्दी ट्रस्टने चर्चगेट, येथील मुख्यालयात या पुरस्कारांचे आयोजन केले होते. मुंबई पोलीस दलातील ३ पोलीस महिलांसह १० पोलीस कर्मचाऱ्यांना […]
हिरानंदानीत, हेरीटेज उद्यान परिसरात पोलीस पथक तैनात
हिरानंदानी, पवई परिसरात पाठीमागील आठवड्यात घडलेल्या दोन गंभीर घटनेनंतर हेरीटेज गार्डन, एवलोन परिसरात पुन्हा पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारीतील विशेष पोलीस पथकाला या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. लवकरच या परिसरात नवीन बीट चौकी देखील बनवण्यात येणार असून, संपूर्ण पोलीस पथक येथे कार्यरत असणार आहे. पवईतील हिरानंदानी परिसरात महाविद्यालयीन मुलांचा रस्त्यांवर, खाण्याच्या […]
ठाणे ते पवई (हिरानंदानी) बेस्टची प्रीमियम बससेवा पुढच्या आठवड्यापासून
बेस्टच्या प्रीमियम बससेवेला पहिल्या दिवसांपासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बेस्ट उपक्रमाने मुंबईतील आणखी ३ मार्गावर ही बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वातानुकूलित प्रीमियम बससेवा ठाणे ते पवई (हिरानंदानी), चेंबूर ते कफ परेड, आणि खारघर ते बीकेसी या तीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम अशी ही बस असणार आहे. ‘चलो […]
पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाचा लोकलमधून पडून मृत्यू
पवई पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) मनोज गजानन भोसले (५७) यांचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी ड्युटी संपवून घरी जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाणे रेल्वे पोलीस यासंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, […]
राम खंदारे यांचा अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्काराने सन्मान
पवईकर आणि ‘तरुण भारत संवाद’ मुंबई वृत्तपत्राचे उपसंपादक रामकृष्ण खंदारे यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘आप्पा पेंडसे स्मृती पुरस्कार’ २०२१ने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील नागरी समस्यांवरील सर्वोत्कृष्ट वृत्तांकन, स्तंभासाठी खंदारे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार भवन […]
रस्त्यांवर प्रवाशांच्या सामानाची जबरी चोरी करणाऱ्याला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
अंधाराचा आणि निर्जन रस्त्यांचा फायदा घेवून रस्त्यावर जबरी चोरी करणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीला गुन्हे शाखा कक्ष ७ ने शिताफीने तपास करत बेड्या ठोकल्या आहेत. फजल रेहमान नजिर अशरफी (वय ३३ वर्ष), राहणार डोंगरी, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरी केलेले अॅपल व वन प्लस कंपनीचे मोबाईल आणि अॅपल […]
चांदिवलीतील समस्यांवर चांदिवलीकरांची पालिका ‘एल’ विभाग सहाय्यक आयुक्तांशी चर्चा
चांदिवलीतील नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी शुक्रवारी सहाय्यक आयुक्त पालिका ‘एल’ विभाग, महादेव शिंदे यांची भेट घेतली. असोसिएशनच्यावतीने मनदीप सिंग मक्कर, कुणाल यादव, योगेश पाटील आणि अमित सोनकर यांनी शिंदे यांची भेट घेवून, चांदिवली परिसरातील नागरी समस्या मांडल्या. डीपी रोड ९, खैरानी रोड आणि चांदिवली फार्म रोडवरील अतिक्रमणे हटवण्याची लेखी तक्रार […]
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेर्धात पवईत आंदोलन
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेर्धात पवईत विविध संघटना आणि पक्षांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ११ डिसेंबरला जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड चौकात हे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, धडक कामगार युनियन, अखिल भारतीय महिला संघटना अशा विविध पक्ष, संघटनांकडून […]
२ महाराष्ट्र इंजि. रेजिमेंट नॅशनल कॅडेट कॉर्प्सतर्फे पवई तलाव परिसराची स्वच्छता
‘पुनीत सागर अभियान’ उपक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), २ महाराष्ट्र इंजिनिअरिंग रेजिमेंट – मुंबई ‘ए’तर्फे रविवार, ४ डिसेंबरला तलाव स्वच्छता कार्यक्रम पवई तलाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या रेजिमेंटच्या कॅडेट्सनी सुमारे १९६ किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करून तो कचरा रिसायकलिंगसाठी सुपूर्द केला. जलस्रोतांना प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण […]
ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी हिरानंदानी रुग्णालयातर्फे ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वॉक’चे आयोजन
कोविड कालावधीत (जवळपास २ वर्षांपासून) निदान न झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) प्रगत अवस्था असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोविड महामारीच्या निर्बंधांमुळे आणि भीतीमुळे अनेक अत्यावश्यक आरोग्य उपचार आणि शस्त्रक्रियांना सुमारे १ ते २ वर्षांचा विलंब झाला आहे. ब्रेस्ट कॅन्सरही त्याला अपवाद नाही. काही स्त्रियांना कोविडच्या काळात लहान गाठीसारखी ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची काही लक्षणे […]
प्रामाणिक रिक्षावाल्याने परत केली दागिन्याने भरलेली बॅग
साकीनाका पोलिसांची मेहनत आणि रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेला आपली रिक्षात विसरलेली पैसे, दागिन्यांची बॅग परत मिळाली आहे. याबाबत महिलेने आपला आनंद आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. साकीनाका परिसरात राहणारी महिला आपल्या काही कामानिमित्त बाहेर रिक्षातून प्रवास करत असताना त्यांची सोन्याचे दागिने, रोख रक्कम, क्रेडिट कार्ड आणि मोबाईल असलेली बॅग चूकभूलीने असल्फा मेट्रो स्टेशनजवळ रिक्षात […]
पवई विहार रोड सोमवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; रस्ता निर्मितीच्या कामामुळे राहणार बंद
पवई विहार कॉम्प्लेक्स रोडवर करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे एका रात्रीसाठी हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. लेकहोम किंवा चांदिवलीकडे जाणाऱ्या नागरिकांनी यासाठी एस एम शेट्टी मार्गे किंवा रामबाग, डी पी रोड नंबर ९ मार्गे प्रवास करायचा आहे. सोमवारी रात्री १० ते मंगळवार सकाळी ६ पर्यंत हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पाठीमागील वर्षी […]
काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांचा नांदेडमध्ये अपघात, पायाला दुखापत
महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री आरिफ नसीम खान (MLA Naseem Khan) यांच्या गाडीला नांदेडमध्ये अपघात झाला असून, अपघातात नसीम खान यांच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. ते सुखरूप असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. ७ तारखेला राज्यात पोहोचत असलेल्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo) सहभागी होण्यासाठी खान हे हैद्राबादहून नांदेडला येत होते. नांदेडमधील भिलोली टोल प्लाझा येथे एका कारची नसीम […]
सवंगड्यांची साद, वाय उच्चारण अन् घुंगरांच्या आवाजाचा आधार; पवईत रंगली अंध फुटबॉल प्रदर्शनी
बॉलमध्ये घुंगरू…. घुंगराच्या दिशेने धावणारे खेळाडू…. आपल्या सवंगड्याच्या आवाजाच्या दिशेने आलेल्या आवाजाचा अंदाज घेत केलेला पास… मग केलेला गोल…. आणि झालेला जल्लोष. हे वातावरण पाहिल्यावर एखादे सरावलेले फुटबॉलपटू खेळ खेळत आहेत, असेच सर्वांना वाटेल. परंतु हे सर्व चित्र पाहायला मिळत होते पवई येथील अंध फुटबॉल सामन्यात. पवईतील महानगरपालिका मैदानात दि राईट शॉटतर्फे महिलांच्या अंध फुटबॉल […]
बेस्ट ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत प्रीमियम बससेवा सुरू करणार
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट (बेस्ट – BEST) ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत प्रीमियम बस सेवा सुरू करणार आहे. पवईसह बीकेसी, ठाणे येथे ही बससेवा असणार आहे. या सर्व बसेस इलेक्ट्रिक असणार आहेत. शहरातील रस्त्यांवरील कारची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरु करण्यात येत आहे. नवरात्रीपासूनच ही बससेवा सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन […]
पर्यावरणपूरक दिवाळीला प्रोत्साहन देण्यासाठी जीएसएसच्या विद्यार्थ्यांची रॅली
पवई येथील गोपाल शर्मा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी १५ ऑक्टोबरला पवई परिसरात रॅली काढली. या सणासुदीच्या हंगामात लोकांना अधिक पर्यावरणपूरक उत्सव निवडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सिएमसीए क्लबच्या विद्यार्थ्यांनी ही खास रॅली आयोजित केली होती. ८वी इयत्तेचे हे विद्यार्थी सिएमसीए (CMCA – चिल्ड्रन्स मुव्हमेंट फॉर सिविक अवेरनेस) क्लबशी संबंधित आहेत. ही संस्था शालेय विद्यार्थ्यांच्या […]
पवईत पीएफआयच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई
महाराष्ट्रात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पीएफआयशी संबंधित कार्यकर्त्यांवर देशभरात एनआयएकडून कारवाई होत असताना पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पवईतही पोलिसांनी या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पीएफआयविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत असलेल्या कारवाई विरोधात पवई येथून अटक पदाधिकारी हा ट्वीट […]