मुंबईच्या पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलावाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे असणाऱ्या मगरी. पाठीमागील काही वर्षापासून त्यांचे येथील दर्शन दुर्लभ झाले होते, मात्र काही दिवसांपूर्वी पवई तलावावर पुन्हा एकदा मगरीचे दर्शन घडले. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचे सांगितले जाते. आयआयटी मुंबईतील पवई तलाव जवळील परिसर, रेनिसंस हॉटेलजवळील भाग, पवई उद्यानातील तलावाला लागून असणारा […]
Archive | Powai News
मनसेकडून आदिवासी महिलांना कुकर वाटप
मराठी भाषा निमित्ताने महिलांना ऊर्जा बचतीचे धडे देण्याचे प्रयत्न मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आदिवासी महिलांना कुकर वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला असून, या संकल्पाला पवईमधून सुरुवात झाली आहे. मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष तसेच फ्लाय फाऊंडेशनचे अध्यक्ष मुनाफ ठाकूर यांनी हा उपकम आयोजित केला असून, आगामी महिनाभरात विविध ठिकाणच्या आदिवासी पाड्यांवर १ […]
रोटरी लेकर्सतर्फे पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी रूमचे नूतनीकरण
रामबाग येथील पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी रूमचे नूतनीकरण रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सतर्फे नुकतेच करण्यात आले आहे. शुक्रवारी रोटरी क्लब ऑफ मुंबईचे डिस्ट्रीक गव्हर्नर डॉ राजेंद्र अग्रवाल, रोटरी लेकर्स अध्यक्ष निमिष अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते या रूमचे उद्घाटन पार पडले. यावेळी सिटीझन्स ऑफ पवईचे संजय तिवारी, रोटरी क्लबचे हनुमान त्रिपाठी, दिपक […]
पवईत मनसेकडून लतादीदींना श्रद्धांजली
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. याच दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी आपल्या आवडत्या स्वरसम्राज्ञीला श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी पवई वॉर्ड क्रमांक १२५ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने लता दीदींना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पवईतील दीदींचा चाहतावर्ग उपस्थित होता. “लता दीदींना कोणीच विसरु शकत नाही. त्यांची स्मृती गीतातून अजरामर राहील” असे मनसे उपशाखा […]
चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; ‘जी-पे’वर घेतले जबरी चोरीचे पैसे
आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी (Robbery) केल्याची घटना पवईत घडली. विशेष म्हणजे जबरी चोरीची रक्कम आरोपींनी आपल्या ‘जी-पे’ (google pay) अकाऊंटवर घेतली होती. पवई पोलिसांनी (Powai police) काही तासातच या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आयुष राजभर (वय १९ वर्ष) आणि सतिश यादव (वय […]
आई-वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून बहिण-भावाची सायकलने शाळेकडे धाव
आई वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून पवईतील एका भाऊ – बहिणीने बुधवारी सायकलने शाळेकडे धाव घेतली. मात्र मुले न सांगता अचानक गायब झाल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. माहिती मिळताच पवई पोलिसांनी काही मिनिटातच तांत्रिक माहितीच्या साहाय्याने त्यांना शोधून काढून पालकांच्या स्वाधीन केले. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज सुरु […]
आजपासून शाळा सुरु, विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापेक्षा जास्त काळ रिकाम्या पड्लेल्या शाळा आज विध्यार्थ्यांच्या रूपात पुन्हा भरल्या. पवईमध्ये सुद्धा आज अनेक शाळांनी सुरुवात केली. मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवत शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुलांचे शाळेत स्वागत केले. १ फेब्रुवारीला शाळा सुरु होण्यापूर्वी ३० आणि ३१ जानेवारीदरम्यान शाळांमधील स्वच्छता आणि […]
पवई, चांदिवलीमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न
आज संपूर्ण देशभरात ७३वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वे वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्रित जमा होण्यावर काही निर्बंध घातले असले तरीही या वर्षीही तेवढ्याच उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पवई आणि चांदिवली परिसरात पाहायला मिळाला. पवई आणि साकीनाका पोलीस ठाणे आणि […]
पवई आरे मार्गाचे १८.३० मीटरपर्यंत रुंदीकरण
पवई-आरे मार्गाचे रुंदीकरणात पवई उद्यानाचा भाग जाण्याची शक्यता. पवईकडून आरेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. १२ मीटर रुंदीच्या या रस्त्याला १८.३० मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. मात्र, यासाठी पवई उद्यानाचा जवळपास १,६१२ चौरस मीटरचा भाग जाणार असल्याची माहिती समोर येत असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता […]
पवईत ५० हजार मातीच्या दिव्यांनी साकारले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट
शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पवईकर कलाकार चेतन राऊत याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पवई येथील हरिश्चंद्र मैदानावर एक आकर्षक पोर्ट्रेट साकारले आहे. कलाकार चेतन राऊतने ५०,००० मातीच्या दिव्यांचा वापर करून ६ रंगछटाचे दिवे वापरून हे पोर्ट्रेट तयार केले आहे. ४० फूट उंच आणि ३० फूट रुंद असे हे पोर्ट्रेट चेतन याने बनवले […]
पवई पोलिसांनी अर्ध्या तासात शोधला प्रवाशाचा हरवलेला लॅपटॉप
मुंबई पोलीस (Mumbai Police) जगात उच्चस्थानी का आहे याची प्रचीती पवई पोलिसांनी (Powai Police) पुन्हा करून दिली आहे. आपले तपासाचे कौशल्य दाखवत पवई पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात एका प्रवाशाने नकळतपणे विसरलेली लॅपटॉप बॅग (laptop bag) शोधून काढत त्याला परत मिळवून दिली आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणारे हे काम असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल मुंबई पोलीस वरिष्ठ […]
लोकांचे हरवलेले ६ लाख किंमतीचे ३४ मोबाईल रिकव्हर करणाऱ्या पवई पोलीस टीमचा पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मान
मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या (powai police) हद्दीत हरवलेले ३४ महागडे मोबाईल (expensive mobile phones) ज्यांची अंदाजे किंमत ६ लाख रुपये आहे, तांत्रिक तपासाच्या (technical investigation) आधारावर शोधून (recovered) त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देणाऱ्या पवई पोलिसांच्या पथकाचा मुंबई पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) (Joint Commissioner of police – L & O) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre […]
मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ तर्फे बेघरांना ब्लँकेट वाटप
मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ तर्फे त्यांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पवई परिसरात राहणाऱ्या बेघर आणि गरजूंना ३०० हून अधिक ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनने सर्वसामान्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मुंबईला विशेषत: याचा मोठा धक्का बसला आहे. कारण हे शहर मोठ्या संख्येने रोजंदारी करणाऱ्या मजुरांचे घर आहे. अनेकांनी […]
पवई तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात
पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या पवई तलावाची पाठीमागील काही वर्षात दुर्दशा होत चालली आहे. पवई तलावात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होवून तलावात जलपर्णी निर्माण झाल्या आहेत. तलावाच्या किनाऱ्यावरील सुशोभिकरण दुर्लक्षित झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पालिका आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पवई तलावाला हे दिवस भोगावे लागले आहेत. मात्र आता या संकटापासून तलावाला मुक्ती मिळणार असून, […]
बुधन सावंत यांनी स्वीकारला पवई पोलीस ठाण्याच्या वपोनि पदाचा पदभार
पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) आबुराव सोनावणे यांची पदोन्नती झाल्यानंतर गेल्या महिनाभर रिक्त पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बुधन सावंत (SPI Budhan Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी त्यांनी आपला हा पदभार स्वीकारला. यापूर्वी साकीनाका पोलीस ठाणे (Sakinaka Police Station) येथे कार्यरत असल्याने परिसराची […]
रोटरी क्लब निर्मित पवई पोलीस ठाणे ऑफिसर रूमचे उदघाटन
पवई पोलीस ठाणेतील ऑफिसर रूमचे उदघाटन गुरुवारी रोटरी क्लबचे डिस्ट्रिकट गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी (DCP Maheshwar Reddy) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रोटरी क्लब प्रेसिडेंट अमित सेठ, प्रोजेक्ट डायरेक्टर हनुमान त्रिपाठी, नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत (SPI Budhan Sawant), सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी उपस्थित होते. मुंबई पोलीस (Mumbai […]
पवई तलावाजवळ कारला आग
पवई तलाव मुख्य गणेशघाटाजवळ एका कारला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनेत गाडीचे जळून मोठे नुकसान झाले आहे. टूअर्स अंड ट्राव्हल कंपनीसाठी काम करणारे राजेंद्रकुमार मेहतो हे नेहमी प्रमाणे आपल्या वेगेनॉर गाडीतून (क्रमांक एमएच ०४ जिडी ५१६७) प्रवासी घेवून जेवीएलआर मार्गे कांजूरच्या दिशेने जात होते. […]
पवई सायकल ट्रॅकच्या ‘सार्वजनिक सभेबाबत नागरिकांची पालिका आयुक्तांना तक्रार; सार्वजनिक सभा झाल्याचे पालिकेने नाकारले
वादग्रस्त पवई सायकल ट्रॅक प्रकल्पाबाबत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांच्या गटांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे “सार्वजनिक सभे”बाबत तक्रार केली आहे. चहल यांना लिहिलेल्या पत्रात, रहिवाशांनी तक्रार केली आहे की ‘पवई तलावाचे पुनरुज्जीवन” या विषयावर २७ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु केवळ काही रहिवासी आणि कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आणि अधिकारी त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे […]
आयआयटी मार्केट सिग्नल बंद ठेवत नागरिकांच्या जीवाशी खेळ
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) सुरु असणाऱ्या मेट्रो-६च्या कामाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलेल्या आयआयटी मार्केटजवळील सिग्नलमुळे स्थानिक नागरिकांना जीवावर उदार होत रस्ता क्रॉस करावा लागत आहे. यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता वाढली असून, लोकांच्या जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पाठीमागील काही महिन्यांपासून जोगेश्वरी विक्रोळी मार्गावरून जाणाऱ्या मेट्रो ६ […]
गलेरिया सर्कलला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव
पवई, हिरानंदानी गार्डन्स येथील गलेरिया सर्कल म्हणजेच काला खंबा चौकाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, सुदीप्तो लाहीरी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, बिजेपी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. भारताचे माजी पंतप्रधान […]