चांदिवली, नहार अमृत शक्ती रोडवर कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी

चांदिवली येथील नहार अमृत शक्ती रोडवर सोमवारी कारने धडक दिल्याने मोटारसायकल स्वार युवक जबर जखमी झाला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नहारमध्ये घडलेली ही दुसरी घटना आहे. एका १४ वर्षाच्या मुलाने एक ज्येष्ठ नागरिकाला ठोकर मारून गंभीर जखमी केल्याची घटना देखील याच भागात घडली होती.

To read community news and happenings regularly follow our WhatsApp News channel for the latest updates on Mumbai’s fastest growing suburb. https://whatsapp.com/channel/0029Va91aMgEAKWGmjYLXT3i

सीसीटीव्हीत कैद घटनेनुसार, कार येथील जैन मंदिर जवळ खैरानी रोडकडून चांदिवलीच्या दिशेने  येणाऱ्या वाहिनीवर युटर्न घेताना याच मार्गावरून येणाऱ्या दुचाकीला धडक देताना दिसत आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, परिणामी दुचाकीस्वार तरुण गाडीवरून उडून रस्त्याच्या बाजूला पडताना दिसत आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झालेले दिसत आहे. याच घटनेत एक पादचारी देखील त्याला धडक बसल्याने जखमी झाला आहे.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली असून, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने बिनधास्त दुचाकीस्वाराला जबर धडक दिली, त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकलने नंतर पादचाऱ्याला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली, असे चांदिवलीकरांनी सांगितले.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमी दुचाकीस्वार आणि पादचाऱ्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या परिसरात घडलेली ही दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेत एका १४ वर्षीय मुलाने आपल्या पालकांची गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला याच भागात धडक दिल्याची घटना घडली होती.

आधीच्या घटनेत पोलिसांनी दाखवलेल्या मवाळ भूमिकेमुळे चांदिवलीकर नाराज आहेत. पोलिसांच्या अशा मवाळ वृत्तीमुळे इतरांना बेशिस्तपणे वाहन चालवण्यास प्रोत्साहन मिळते आहे. असेही चांदिवलीकरांचे मत असून, या भागात पोलिसांनी गस्त वाढवत सुसाट आणि नियमबाह्य वाहने चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी चांदिवली रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे केली जात आहे.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!