आमदारांकडून पवई विहारच्या समस्यांची पाहणी

पवई विहार कॉम्प्लेक्समधील समस्यांची आमदार दिलीप लांडे यांच्यातर्फे मंगळवारी पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पवई येथील पवई विहार कॉम्प्लेक्समधील अनेक नागरी समस्या या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वाढत आहेत. तसेच प्रवेश भागातील काही भाग हा न्यायालयीन वादात अडकल्याने देखील समस्या उद्भवत आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार लांडे यांनी या भागात पाहणी केली.

या कॉम्प्लेक्समध्ये बनवण्यात आलेली ड्रेनेज लाईन ही सुरुवातीच्या काळात बनवण्यात आली होती. तसेच अनेक भागात त्याचे कनेक्शन पूर्ण नसल्याने ड्रेनेज साठून राहण्याची समस्या होत असते, त्यामुळे पंपिंग करून घाण बाहेर काढावी लागते. कधी कधी पंप बंद पडल्यास संपूर्ण घाण रस्त्यावर पसरते त्यामुळे याचे निवारण करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली.

To read community news and happenings regularly follow our WhatsApp News channel for the latest updates on Mumbai’s fastest growing suburb. https://whatsapp.com/channel/0029Va91aMgEAKWGmjYLXT3i

“कॉम्प्लेक्सच्या प्रवेश भागात असणाऱ्या लेक पलेस ते म्हाडा या भागात असणारा रस्ता हा गेली अनेक वर्ष नादुरुस्त अवस्थेत आहे. आमदारांनी प्रयत्न करत विजय विहार समोरील रस्त्याचा प्रश्न मिटवला तसाच या भागातील रस्त्याची समस्या सोडवावी अशी मागणी पवई विहार रहिवाशांनी केली.

यासोबतच उद्यानाची दुरावस्था, वाहनांची पार्किंग, कचरा अशा अनेक समस्यांकडे रहिवाशांनी आमदारांचे लक्ष वेधले. नागरिकांच्या या समस्या त्वरित सोडवण्यासाठी यावेळी आमदारांनी पालिका अधिकाऱ्यांना आदेश दिले.  तसेच न्यायालयीन किंवा विकासकाच्या वादात अडकलेल्या भागात कायदेशीर चर्चा करू असे आश्वासन आमदार लांडे यांनी रहिवाशांना दिले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!