विद्यापीठ स्तरीय जलतरण स्पर्धेत चंद्रभान शर्मा कॉलेजला ५ सुवर्ण

विद्यापीठ स्तरीय आंतर-महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत चंद्रभान शर्मा कॉलेजच्या (CSC) विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले. विवा कॉलेजतर्फे ९ सप्टेंबरला आयोजित या स्पर्धेत अनेक उल्लेखनीय गोष्टी पाहायला मिळाल्या. यावेळी आपली चमक दाखवत आर्यन भोसले या विद्यार्थ्याने ५ सुवर्णपदके मिळवत, मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित आंतर विभागीय जलतरण स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रतिमा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत थरारक खेळांनी भरलेल्या स्पर्धेत चंद्रभान शर्मा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व आर्यन भोसले, अर्थ आचरेकर आणि प्रबिता प्रधान  या विद्यार्थ्यांनी केले.

To read community news and happenings regularly follow our WhatsApp News channel https://whatsapp.com/channel/0029Va91aMgEAKWGmjYLXT3i

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरला तो आर्यन भोसले. पूलमध्ये असामान्य कामगिरी करत त्याने पाच सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. १०० मीटर बॅकस्ट्रोक, २०० मीटर बॅकस्ट्रोक, २०० मीटर फ्रीस्टाइल, ४०० मीटर फ्रीस्टाइल आणि ४०० मीटर वैयक्तिक मेडली अशा स्पर्धेत आपले कौशल्य दाखवत प्रत्येक स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक कमावले.

आर्यन भोसलेच्या उल्लेखनीय कामगिरीने चंद्रभान शर्मा महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून, मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या अत्यंत स्पर्धात्मक अशा आंतर विभागीय जलतरण स्पर्धेतही मानाचे स्थान मिळवून दिले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!